मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणज्यि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दूर दृश्य प्रणालीच्या (झूम अॅप) माध्यमातून ऊर्जा संवर्धनवर आॅनलाइन वेबिनार आयोजीत करण्यात आले होते. या वेबिनारमधे ११५ जणांनी सहभाग घेतला.पुणे येथील पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या स्वाती कुमारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रिनकेतन विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथील इन्स्टिट्यूट पेट्रोलियम इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. नितीन लिंगायत यांनी ऊर्जा संवर्धन आजच्या काळातील गरज व्यक्त करून भारत देशासाठी ऊर्जेची किती आवश्यकता आहे, वर्षभरात विजेची होणारी निर्मिती, तसेच विजेचा वापर, बचत कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी .एस. जगदाळे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्र म तसेच ऊर्जा संवर्धन व पर्यावरण संवर्धन याविषयी माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. पवनसिंग परदेशी यांनी केले. प्रा. एन. ए .पाटील यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. तर डॉ. गजानन शेंडगे यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. वर्षाराणी पेडेकर यांनी केले.
ऊर्जा संवर्धनावर आॅनलाइन चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 5:04 PM
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणज्यि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दूर दृश्य प्रणालीच्या (झूम अॅप) माध्यमातून ऊर्जा संवर्धनवर आॅनलाइन वेबिनार आयोजीत करण्यात आले होते. या वेबिनारमधे ११५ जणांनी सहभाग घेतला.
ठळक मुद्देमनमाड महाविद्यालयाच्या वेबिनारमध्ये ११५ जणांचा सहभाग