विद्यार्थी वाहतूकदार आर्थिक संकटात
नाशिक : नवीन वर्षातही किमान दिवाळीपर्यंत शाळा उघडण्याची शक्यता कमीच असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा व स्कूल बसचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. या विद्यार्थी वाहतूकदारांना शाळा सुरू होण्याची आस लागली आहे. मात्र, अजून किमान सहा महिने संकट कायम राहण्याचीच चिन्हे आहेत.
रस्त्यावर मोकाट श्वानांचा उपद्रव
नाशिक : पंचवटी परिसरात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. श्वानांच्या झुंडी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून फिरत असल्याने नागरिकांनाही त्यांची भीती वाटत आहे. विशेषत्वे सकाळच्या सुमारास नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकांना तर मार्गदेखील बदलावा लागतो.
घरांमध्ये पत्ते, बुद्धिबळाचे डाव
नाशिक : विद्यार्थ्यांना असलेल्या सुट्ट्या आणि अनेक नागरिकांना निर्बंधांमुळे असलेल्या सुट्टीचा परिणाम म्हणून घराघरांमध्ये पत्ते, बुद्धिबळ, नया व्यापारचे डाव रंगू लागले आहेत. त्यामुळे घरांमध्ये राहूनदेखील उपलब्ध खेळांमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न नागरिकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
ऑनलाइन योगालाही वाढता प्रतिसाद
नाशिक : शहरात बहुतांश नागरिक आणि कुटुंबीय तंदुरुस्त राहण्यासाठी घरच्या घरी उपयुक्त ठरणाऱ्या ऑनलाइन योगाच्या सेशन्सला प्राधान्य देत आहेत. कुटुंबासह एकत्रित अर्धा, पाऊण तास ऑनलाइन योगा करून स्वास्थ्यसंवर्धनाचा प्रयत्न संपूर्ण कुटुंबाकडून केला जात आहे.