तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शासनाच्या आदेशाप्रमाणे योजन समितीने ऑनलाइन व्याख्यानमाला करण्याचे ठरवले असून, सोमवारी (दि. २३) ते रविवारपर्यंत (दि.२९) महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ऑनलाइन- झूम ॲप, यू-ट्यूब लिंक आणि फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आयोजित केली आहे.
व्याख्यानमालेचे सोमवारी उद्घाटन (दि. २३) आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचे (आदर्श गावनिर्मितीत लोकसहभागाचे महत्त्व), (दि. २४ व २५) रामचंद्र देखणे - पुणे (महाराष्ट्रातील संत परंपरा) तर दुसऱ्या दिवशी (महाराष्ट्रातील लोक परंपरा आणि लोक प्रबोधन), (दि.२६ व २७) राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, पुणे यांचे दोन्ही दिवस (गौरवशाली भारताचा इतिहास आणि वर्तमान), तर (दि. २८ व २९ ) विवेक घळसासी-नागपूर (सकारात्मकतेची लस) तर दुसऱ्या दिवशी (छत्रपती शिवराय काळाच्या पुढचे नेतृत्व) या विषयाने व्याख्यानमालेचा समारोप होईल.
ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसणाऱ्या व ज्येष्ठ नागरिकांनाही या व्याख्यानांचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली असून, त्यावेळी कोविडसंदर्भातील सर्व शासन नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव प्रतिष्ठान व व्याख्यानमाला आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. विलास देशमुख यांनी केले आहे.