नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरातील विविध ठिकाणी असलेले उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. मात्र यासंदर्भात मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारपासून (दि. १६) पुन्हा दस्तनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दस्तनोंद करण्यासाठी नागरिकांनी कार्यालयात दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अथवा ऑनलाईन पद्धतीने वेळ निश्चित करून येणे अनिवार्य करण्यात आले आहे. याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम असतानाच मुद्रांक शुल्क विभागाने शहरासह जिल्ह्यातील कार्यालये बंद ठेवली होती. परंतु, शुक्रवारपासून सर्व कार्यालयांमध्ये दस्तनोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दस्तनोंदणीसाठी ऑनलाइन वेळ अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 1:21 AM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरातील विविध ठिकाणी असलेले उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. मात्र यासंदर्भात मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारपासून (दि. १६) पुन्हा दस्तनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली
ठळक मुद्देएका दस्तनोंदीसाठी १५ मिनिटांचा वेळ