नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशु दक्षता विभागाची केवळ १८ ‘वॉर्मर’ची क्षमता आहे; मात्र उपचारासाठी दाखल होणाºया शिशुंची संख्या शंभराच्या पुढे असल्यामुळे आॅगस्ट महिन्यात ५५ अर्भके ‘वॉर्मर’वर दगावली. याप्रकरणी राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सकांना गुरुवारी (दि.७) निवेदन देण्यात आले.जिल्हा शासकीय रुग्णालयात शहर व परिसरासह जिल्ह्यातून साडेतीनशे अर्भके आॅगस्टमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. त्यापैकी ५५ बालकांचा श्वास ‘व्हेंटिलेटर’अभावी थांबल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एप्रिल महिन्यापासून अद्याप या विभागात दगावलेल्या बालकांची संख्या १८८वर पोहचलेली आहे. एकूणच अपुरी यंत्रणा, भौतिक सुविधांचा अभाव, गरजेपेक्षा अत्यंत कमी वॉर्मरची संख्या व त्या तुलनेत कमी पडणारे तज्ज्ञ मनुष्यबळ या कारणांमुळे बालकांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात शिशु दक्षता विभागाची क्षमता वाढवून त्या दृष्टीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने यावेळी केली. यावेळी नाना महाले, रंजन ठाकरे, अंबादास खैरे, बॉबी काळे, मकरंद सोमवंशी आदी उपस्थित होते.
शिशु विभागात केवळ १८ ‘वॉर्मर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:07 AM