नाशिक: जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस बरसला नसून गेल्या २४ तासात अवघा ८ मि.मी. पाऊस झाला. रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हुलकावणी दिली. दिंडोरी, सिन्नर वगळता इतर तालुक्यांमध्ये पाऊस झालाच नाही. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असतांना पावसाचा हजेरी लावलेली नाही. नाशिक शहरात दिवसभर ऊन आणि दाटलेले आभाळ असा निसर्गाचा खेळ सुरू होता. जिल्ह्यात ढगाळ मध्यम पाऊस किंवा गडगडाटासह वादळाची शक्यता वर्तविण्यात आली होती. हवामान खात्याचा अंदाज चुकवत जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिली. धरणातील पाण्याची पातळी कमी झालेली असताना लांबलेल्या पावसामुळे चिंता निर्माण झालेली आहे. शेतीची कामे सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांनाही पावसाने चिंतेत टाकले आहेत.
चोवीस तासात अवघा ८ मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 1:19 AM