नाशिक : जिल्ह्यातील तब्बल ५०९ नागरिक कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत एकूण १० हजार २८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात २ हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक १ हजार ५४९ रुग्ण बाधित आहेत.नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १५६, चांदवड ४९, सिन्नर १११, दिंडोरी ४६, निफाड १२१, देवळा ६९, नांदगाव ६७, येवला २४, त्र्यंबकेश्वर १६, सुरगाणा १९, कळवण २, बागलाण १९, इगतपुरी १०१, मालेगाव ग्रामीण २९ असे एकूण ८२९ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५४९, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ८९, तर जिल्ह्णाबाहेरील २ असे एकूण २ हजार ४६३ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी दिवसभरात बाधितांच्या संख्येत एकूण ५७० नवीन बाधितांची भर पडल्याने आत्तापर्यंतच्या जिल्ह्णातील बाधित रुग्णांची संख्या १३ हजार २२७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मंगळवारी महानगरात ११, तर जिल्हाबाह्ण नंदूरबारचा एक रुग्ण कोरोनाने दगावल्यामुळे एकूण मृतांच्या संख्येत १२ने भर पडली आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४८४ वर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्णात आतापर्यंत झालेल्या एकूण ४८४ मृत्यूंपैकी नाशिक ग्रामीणला ११३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २६७, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ८४ व जिल्ह्णाबाहेरील २० रु ग्णांचा मृत्यू झाला आहे.नवीन १६०६ संशयितांची भरदिवसभरात जिल्ह्णाच्या विविध भागातील रुग्णालयांमध्ये मिळून तब्बल १६०६ नवीन संशयितांची भर पडली आहे. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालयात १०८२, नाशिक ग्रामीणला १९३, गृह विलगीकरणात २७४, मालेगाव मनपा रुग्णालये २७, डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज २० आणि जिल्हा रुग्णालय १० अशी वाढ झाली आहे, तर प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ९६१ वर पोहोचली आहे.
केवळ २,४६३ बाधितांवर उपचार सुरूदिलासा : जिल्ह्यातील कोरोनामुक्त नागरिकांची संख्या १० हजार २८० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 1:56 AM