नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि.७) एकूण ३७२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, २७५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, सोमवारी जिल्ह्याच्या केवळ ग्रामीण भागातच एकमेव मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १८३० वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३ हजार ५६० वर पोहोचली असून, त्यातील ९८ हजार ४३९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३२९१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.०६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९५,८६, नाशिक ग्रामीण ९३.६४, मालेगाव शहरात ९२.७५, तर जिल्हाबाह्य ९२.३२ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,२९१ बाधित रुग्णांमध्ये १,८९८ रुग्ण नाशिक शहरात, १,२१९ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १४८ रुग्ण मालेगावमध्ये, तर २६ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ९२ हजार ७९९ असून, त्यातील दोन लाख ८८ हजार ३८०रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख तीन हजार ५६० रुग्ण बाधित आढळून आले असून, ८५९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.