सटाणा : तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची येत्या १५ जूनला निवडणूक होऊ घातली आहे. अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असतांना १७ जागांसाठी बुधवारी (दि.१८) फक्त नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान, बहुतांश उमेदवारांनी गुरुवारचा मुहूर्त शोधल्याने अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.समको बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, सत्ताधारी रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, पंकज ततार, जगदीश मुंडावरे यांनी गटाने आदर्श पॅनलची निर्मिती केली आहे. तर विरोधी गटाचे डॉ. व्ही. के. येवलकर, विजय भांगडिया, यशवंत येवला यांनी श्रीसिद्धिविनायक पॅनलची निर्मिती केली आहे. दोन्ही पॅनलकडून सक्षम उमेदवार शोधण्यासाठी चाचपणी केली जात आहे. १९ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा अंतिम दिवस असताना बुधवार अखेर १७ जागांसाठी अवघे नऊ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, दोन्ही पॅनलच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गुरुवारचा मुहूर्त साधला असून बहुतांश उमेदवार गुरुवारी शक्तिप्रदर्शनात अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.बुधवारअखेर विद्यमान संचालक प्रकाश हेमचंद सोनग्रा व प्रवीण सुरेश बागड यांनी अनुक्रमे अनुसूचित जाती, जमाती गटातून व सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल केला. महिला राखीव गटातून पुष्पा रामचंद्र येवला यांनी अर्ज दाखल केला. अनुसूचित जाती, जमाती गटातून चैनसुख हेमचंद सोनग्रा यांनी, तर सर्वसाधारण गटातून रमणलाल बुधमल छाजेड, देविदास बारकू येवला, विजय भिकचंद भांगडिया, दत्तात्रय वामन कापुरे, पुष्पा रामकृष्ण येवला यांनी अर्ज दाखल केला.
१७ जागांसाठी फक्त नऊ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 10:45 PM
सटाणा : तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची येत्या १५ जूनला निवडणूक होऊ घातली आहे. अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असतांना १७ जागांसाठी बुधवारी (दि.१८) फक्त नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान, बहुतांश उमेदवारांनी गुरुवारचा मुहूर्त शोधल्याने अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देआज अखेरचा दिवस : समको बँक निवडणूक