शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

ढीगभर फाइलींचा उपसा अवघे नऊ अभियंते करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:27 AM

शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी सुमारे अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले असून, त्यांची पडताळणी करण्यासाठी अवघे नऊ अभियंता शिल्लक असून ते प्रत्यक्ष घटनास्थळी केव्हा मोजमाप करणार? असा प्रश्न केला जात आहे.

नाशिक : शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी सुमारे अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले असून, त्यांची पडताळणी करण्यासाठी अवघे नऊ अभियंता शिल्लक असून ते प्रत्यक्ष घटनास्थळी केव्हा मोजमाप करणार? असा प्रश्न केला जात आहे. राज्य शासनाच्या वतीने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आल्यानंतर महापालिकेने अशाप्रकारचे बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी दि. ३१ पर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार सुमारे अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले आहेत. परंतु हे किती प्रस्ताव आहेत, याची पडताळणी करण्यासाठीदेखील महापालिकेला उसंत मिळालेली नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे नगररचना विभागातील अभियंत्यांच्या बदल्या झाल्या असून, पुरेशा प्रमाणात अभियंते या विभागात उपलब्ध नसल्याचे अडचण निर्माण झाली आहे.  नगररचना विभागात एकूण २२ अभियंत्यांपैकी १३ अभियंत्यांच्या बदल्या झाल्या असून, सध्या केवळ नऊ अभियंते शिल्लक आहेत. त्यांच्याकडून नियमित कामे सांभाळून बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याच्या योजनेत दाखल प्रकरणांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहानिशा कशी आणि केव्हा करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नगरचनाला उपसंचालकनाशिक महापालिकेच्या नगररचना विभागात सध्या सहायक संचालक नगररचना असे पद आहे. तथापि, मध्यंतरी शासनाने नगररचना उपसंचालकपद मंजूर केले आहे. नाशिक महापालिकेचा वाढता विस्तार आणि नव्या विकास आराखड्याची अंमलबजावणी याचा विचार करता उपसंचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली असून, त्यासंदर्भात शासनाला पत्रदेखील दिले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका