नाशिक : रेशनच्या धान्याविना कुणीही राहू नये यासाठी रेशनधान्य वितरणप्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. ई-पॉस यंत्रणेमुळे तर कार्डधारकाचे धान्य हे त्यालाच मिळावे यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पोर्टेबिलिटी सुविधा. कार्डधारकाला एखाद्या दुकानदाराविषयीची तक्रार असेल तर किंवा त्याला घरापासून जवळ असलेल्या रेशनदुकानातून धान्य घेता यावे, दूरवरील दुकानात जाण्याची भटकंती टळावी यासाठी ग्राहकांना पोर्टेबिलिटी सुविधा देण्यात आलेली आहे. परंतु या सुविधेचा लाभ केवळ काही लोकच घेत असावेत असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार इतर ठिकाणी जाऊन रेशनचे धान्य मिळविताना होणारी परवड सहन करावी लागते. इतर दुकानदार दुसऱ्या कार्डधारकांला पहिल्या प्रयत्नात धान्य देत नसल्याची तक्रार आहे. काही दुकानदार पार्टेबिलिटीनुसार धान्य देतात, परंतु पुढच्या वेळी देतीलच अशी शाश्वती नाही. ओळखीच्या ठिकाणी धान्य घेण्यालाच ग्राहक प्राधान्य देत आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : रेशनच्या धान्याविना कुणीही राहू नये यासाठी रेशनधान्य वितरण प्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. ई-पॉस यंत्रणेमुळे तर कार्डधारकाचे धान्य हे त्यालाच मिळावे यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पोर्टेबिलिटी सुविधा. कार्डधारकाला एखाद्या दुकानदाराविषयीची तक्रार असेल तर किंवा त्याला घरापासून जवळ असलेल्या रेशनदुकानातून धान्य घेता यावे, दूरवरील दुकानात जाण्याची भटकंती टळावी यासाठी ग्राहकांना पोर्टेबिलिटी सुविधा देण्यात आलेली आहे. परंतु या सुविधेचा लाभ केवळ काही लोकच घेत असावेत असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार इतर ठिकाणी जाऊन रेशनचे धान्य मिळविताना होणारी परवड सहन करावी लागते. इतर दुकानदार दुसऱ्या कार्डधारकाला पहिल्या प्रयत्नात धान्य देत नसल्याची तक्रार आहे. काही दुकानदार पार्टेबिलिटीनुसार धान्य देतात, परंतु पुढच्या वेळी देतीलच अशी शाश्वती नाही. ओळखीच्या ठिकाणी धान्य घेण्यालाच ग्राहक प्राधान्य देत आहेत.
--इन्फो--
या आहेत तक्रारी
महिना संपायला येऊनही रेशनचे धान्य मिळण्याला उशीर होतो. दुकानात अनेकदा चकरा माराव्या लागातात. ई-पॉस मशीन अनेकदा काम करीत नाही. त्यामुळे ग्राहकांना परतावे लागते. पोर्टेबिलिटी सुविधा असली तरी इतर दुकानदार पहिल्यांदा दुकानात गेल्यानंतर लागलीच प्रतिसाद देत नाहीत, दिला तर पुन्हा येऊ नका असेही सांगतात.
--इन्फो---
३५ दुकानांवर कारवाई ३५ दुकानांवर कारवाई
नियमबाह्य काम करणाऱ्या तसेच इतर तक्रारी असलेल्या जिल्ह्यातील ३५ रेशनदुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. १२ दुकानदारांवर निलंबनाची, तर २३ दुकानदारांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्येे तर सहा जणांवर फौजदारी गुन्हेदेखील दाखल करण्यात आलेले आहेत. नियमबाह्य काम करणाऱ्या तसेच इतर तक्रारी असलेल्या जिल्ह्यातील ३५ रेशनदुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. १२ दुकानदारांवर निलंबनाची, तर २३ दुकानदारांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्येे तर सहा जणांवर फौजदारी गुन्हेदेखील दाखल करण्यात आलेले आहेत.
--कोट---
प्रत्येक कार्डधारकाला धान्य मिळावे हेच शासनाचे धोरण आहे. त्यासाठी अनेक उपायोजना आणि यंत्रणा राबविल्या जातात. पोर्टेबिलिटी सुविधा हा त्याचाच एक भाग आहे. ग्राहकांना कुठल्याही स्वस्त रेशनधान्य दुकानातून धान्य घेता येते. ग्राहकांची काही तक्रार असेल तर संपर्क करावा.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
प्रत्येक कार्डधारकाला धान्य मिळावे हेच शासनाचे धोरण आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना आणि यंत्रणा राबविल्या जातात. पोर्टेबिलिटी सुविधा हा त्याचाच एक भाग आहे. ग्राहकांना कुठल्याही स्वस्त रेशनधान्य दुकानातून धान्य घेता येते. ग्राहकांची काही तक्रार असेल तर संपर्क करावा.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी