शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

हजार लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 9:37 PM

नाशिक : जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी संख्येचा वर्षानुवर्ष असलेला अनुशेष पूर्ण करण्यासाठी आता महानगर, जिल्हा प्रशासनाला धावाधाव करावी लागत आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे दोनवेळा जाहिराती देऊनही कर्मचारी भरती झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात असलेल्या ६१ लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी असलेली शासकीय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार मिळून असलेली ५३७६ ही संख्या हजार कर्मचाºयामागे एकापेक्षाही कमी कर्मचारी अशीच आहे.

ठळक मुद्देकर्मचारी पूर्ततेसाठी ऐनवेळी धावाधाव : वर्षानुवर्ष कर्मचाऱ्यांचा अनुशेष ठेवून आपत्ती कोसळल्यानंतर प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला झाली उपरती

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी संख्येचा वर्षानुवर्ष असलेला अनुशेष पूर्ण करण्यासाठी आता महानगर, जिल्हा प्रशासनाला धावाधाव करावी लागत आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे दोनवेळा जाहिराती देऊनही कर्मचारी भरती झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात असलेल्या ६१ लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी असलेली शासकीय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार मिळून असलेली ५३७६ ही संख्या हजार कर्मचाºयामागे एकापेक्षाही कमी कर्मचारी अशीच आहे.नाशिकच्या आरोग्य विभागात तसेच जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय महत्त्वाची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद अधिनस्त आरोग्य कर्मचारी यांची २११४ पदे मंजूर असून, त्यापैकी सुमारे ११८४ पदे भरलेली आहेत, तर ९३० पदे रिक्त आहेत. परिणामी नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत आरोग्य कर्मचारी यांच्यावर कामाचा मोठा ताण पडत आहे. कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक व उपचारात्मक बाबींसाठी नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी यांची संवर्ग-१ ची सर्व पदे तसेच जिल्हा परिषद अधिनस्त आरोग्य विभागाची ९३० पदे तत्काळ भरण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील सुमारे २५०० कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के अर्थात ५०० हून अधिक कर्मचाºयांचा अनुशेष कायम आहे. आरोग्य विभागात सध्या जिल्ह्यात ११० डॉक्टर्स, ५४० नर्सिंग, ५५० कर्मचारी, ९५ कार्यालयीन कर्मचारी कार्यरत आहेत. त्याशिवाय राष्टÑीय आरोग्य अभियानाच्या विविध योजनांतर्गत सुमारे १५०० कंत्राटी कामगार आरोग्य विभागात कार्यरत आहेत. नवीन भरतीसाठी केल्या जात असलेल्या प्रकियेला प्रारंभी तितकासा प्रतिसाद मिळालेला नाही. आदर्श कर्मचारी संख्येच्या तुलनेत कर्मचाºयांचे प्रमाण अत्यल्प असून, त्याबाबत उपाययोजना केली तरच सर्व यंत्रणांवरील ताण हलका होऊन आरोग्य विभाग सुरळीतपणे चालू शकेल. रिक्त पदांचा पाठपुरावाजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी २११४ पदे मंजूर असून, त्यातील ११८४ पदे सध्या कार्यरत आहेत. आरोग्य विभागातील रिक्तपदांची माहिती शासनाकडे कळविण्यात येऊन ती भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनानेही अलीकडे रिक्त पदे भरण्याची तयारी दर्शविली आहे. पदे रिक्तअसली तरी, राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदे भरून आरोग्य विभाग सेवा देण्यास सक्षम आहे.- डॉ. कपील आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारीभरतीस प्रतिसाद मिळतोयकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भरतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कर्मचाºयांचा अनुशेष लवकरच भरुन निघेल अशी अपेक्षा आहे. सर्व आरोग्य कर्मचारी अत्यंत सक्षमतेने गत चार महिने अव्याहतपणे कार्यरत आहेत. त्यात नवीन कर्मचारी भरती झाल्यास या कर्मचाºयांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी होण्यासदेखील मदत होईल.-डॉ. निखिल सैंदाणेअतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल