नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीसाठी पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या नावाखाली बंदोबस्ताचा अतिरेक करून भाविकांची गैरसोय केल्याने सर्व सरकारी यंत्रणेला चौफेर टीकेचे धनी व्हावे लागले होते. यामुळे पालकमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावून फेरनियोजन करत क ाही बदल केले. नाशिकरोडच्या भाविकांना लक्ष्मीनारायण घाटाचा पर्याय खुला करून देण्यात आला; मात्र नाशिकरोडहून येणाऱ्या भाविकांना प्रशासनाने दोन वेगवेगळे थांबे निश्चित करून दिल्याने पायपीट करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस व जिल्हा प्रशासनाने नाशिकरोडला रेल्वेने दाखल झालेल्या भाविकांना शहर बसेसद्वारे द्वारकापर्यंत आणून सोडण्याची व्यवस्था केली आहे. प्रशासनाचा हा बदल स्वागतार्ह असला तरी पुणे महामार्गावरून नाशिकरोडला आलेल्या भाविकांना मात्र शहर बसने थेट महामार्गापर्यंत सोडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. यामुळे महामार्गाला ज्या भाविकांना उतरविले जाणार आहे, त्यांच्यावर सुमारे अडीच किलोमीटरची पायपीट संकट ओढावणार हे निश्चित! महामार्गावर उतरणाऱ्या भाविकांना द्वारका ओलांडून क न्नमवार पुलापासून लक्ष्मीनारायण घाटावर स्नानासाठी जावे लागेल, यामुळे प्रशासनाने जणू प्रवासाचे साधन बघून दुजाभाव केला की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण रेल्वेने नाशिकरोडला आलेले आणि महामार्गावरून नाशिकरोडला आलेल्या भाविकांना बसेसद्वारे दोन वेगवेगळ्या ठिकाणी का उतरविले जाणार या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. (प्रतिनिधी)
लांब पल्ल्याचा अट्टहास का ?नाशिकरोडवरून येणार्या बसेसपैकी काही बसेस या पुणे महामार्गाने थेट द्वारकेपर्यंत जाणार आहेत, तर काही बसेस या आंबेडकरनगर सिग्नलवरून डाव्या बाजूने कॅनॉलच्या सावतामाळीमार्गाने डीजीपीनगर-वडाळामार्गे वळविण्यात येणार आहे. या बसेस पुढे थेट लेखानगरमार्गे समांतर रस्त्यावरून महामार्ग स्थानकापर्यंत जाणार आहेत. बसेस इंदिरानगर बोगदा बंद असल्यामुळे साईनाथनगर चौकातून डाव्या बाजूला वळण घेत कलानगर, लेखानगरवरून समांतर रस्त्यावरून महामार्ग स्थानकापर्यंत जातील. एकू णच कॅनॉलरोडचा पर्याय हा लांब पल्ल्याचा ठरणारा आहे. यामुळे भाविकांबरोबरच प्रशासनाचीही गैरसोय होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या बदलाविषयी विचार करून भाविकांची होणारी पायपीट थांबवावी
बसस्थानकात उभ्या असणार्या बसेसमध्ये जे भाविक बसतील त्यांची प्रशासन तपासणी कशी करणार? कोण रेल्वेने आले अन् कोण महामार्गाने आले हेदेखील अद्याप स्पष्ट नाही. नाशिकरोड बसस्थानकातून भाविकांना घेऊन जाणार्या शहर बसेसपैकी कोणत्या बसेस द्वारकेवर व कोणत्या महामार्गावर जातील हे अखेरीस बसचालकाच्या मर्जीवरच ठरणार आहे. त्यामुळे बस वाहतुकीवर नियंत्रण नेमके कोणाचे राहणार पोलीस यंत्रणेचे की महामंडळाचे हे कोडेही उलगडणे कठीण आहे.अधिक ठरेल, यात शंका नाही. याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून फेरनियोजनातील हा बदल भाविकांच्या व सरकारी व्यवस्थापनाच्याही दृष्टीने गैरसोयीचा ठरणारा आहे, हे प्रशासकीय यंत्रणेच्या लक्षात आणून देणे तितकेच गरजेचे आहे.
डीजीपीनगरमार्गे कॅनॉलरोडने येणार्या बसेस वडाळागाव चौफुलीवरून वडाळागावरोडने वळवित थेट वडाळा नाक्यापर्यंत जाऊ शकतात. कारण साईनाथनगर-विनयनगर रस्ता हा एकेरी असून, वडाळारोडपेक्षा अरुंद व अधिक वर्दळीचा आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच महामार्गाला भाविकांना उतरविण्यापेक्षा वडाळानाका उड्डाणपूल टी-पॉइंटवर भाविकांना सोडले तर पायपीट कमी होण्यास मदतच होईल.
एकूणच प्रशासनाने एकाच ठिकाणांच्या भाविकांना दोन वेगवेगळ्या थांब्यांवर घेतलेला निर्णय फायद्याऐवजी तोट्याचाच.