नाशिक : कृषी यांत्रिकीकरण योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने सुरु केलेले महाडीबीटी संकेतस्थळ गावपातळीवरील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून या संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करतांना शेतकऱ्यांना विविइ अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यस्तरावर लॉटरी पध्दतीने काढलेल्या सोडतीत जिल्ह्यातील १३६१ शेतकऱ्यांनी विविध योजनांच्या लाभासाठी निवड करण्यात आली असून जिल्हा कृषी विभागाने अतापर्यंत ४४ शेतकऱ्यांना अनुदान देण्यास मंजुरी दिसली असून केवळ ७ शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या फलोत्पादन, कांदा चाळ, पॅक हाउस, जुन्ंे फळबागांचे पुनरुज्जीवन,हरीतगृह, शेडनेट., प्लास्टीक मल्चींग , थिबक , तुषार सिंचन आदी विविध योजनांचे लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना एकच अर्ज करता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. यावर्षी या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली त्यात जिल्ह्यातील १३६१ शेतकऱ्यांची निवड झाली. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी त्यानंतर कागदपत्र अपलोड करावयाचे असतात त्याला मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्याने संबंधीत साहित्य खरेदी करुन त्याचे बिल जमा केल्यानंतर त्यांना अनुदान देण्यात येते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने कागदपत्र जमा करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काहीवेळा सरोवरचीही अडचण नर्माण होते. यामुळे अद्याप अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील केवळ सात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुदानाचा लाभ मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रीत अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा कृषी विभागातफेर् उपाययोजना करण्यात येत असून आता कृषी विभागातच यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून या कर्मचाऱ्यामार्फत अपलोडची कामे करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
यांत्रिकीकरण अनुदान जिल्ह्याची स्थितीलॉटरीत निवड झालेले शेतकरी - १३६१कागदत्र अपलोड होणे बाकी - ९५५कागदपत्र अपलोड - २७८अनुदान मंजुर - ४४पेमेंट प्रेसेसींग - २७अनुदान दिले - ७ रद्द झालेले प्रस्ताव - ३४