नाशिक : वाहनांची कागदपत्रे नाही, हेल्मेट परिधान केलेले नाही तसेच पीयूसी नाही अशी विविध कारणे पुढे करून वाहतूक शाखेच्या वतीने शहरात सध्या केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.शहरातील बेशिस्त रिक्षाचालक थांबा नसताना रिक्षा थांबविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे तसेच अन्य चारचाकी वाहनचालक भररस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा करीत असले तरी त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने वाहतुकीचे नियम केवळ दुचाकी वाहनधारकांसाठी आहे का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे. गत काही दिवसांपासून नाशिक शहरात सर्वत्र वाहतूक शाखेचे पोलीस व स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांकडून वाहन तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्य दुचाकीवाहनधारकांना टार्गेट केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.शहरातील विविध मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांवर बेशिस्त रिक्षाचालकांकडून सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, थांबा नसताना रिक्षा थांबविणे तर मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा परिसरातील रस्त्यावर चारचाकी उभ्या करणे, होळकर पुलावर चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करून सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली जात असली तरी वाहतूक शाखेकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.ऐरवी रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली म्हणून पोलिसांकडून खाकीचा धाक दाखवून दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाइ केली जाते मग वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत नियमांची पायमल्ली करणाºया वाहनचालकांना मोकळीक का असा सवाल नागरिकांनी केला आहे. शासनाच्या तिजोरीत महसुलाची रक्कम वाढावी यासाठी वाहतूक शाखा दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सक्तीची मोहीम राबवित आहे.
नाशिक शहरात केवळ दुचाकी वाहनधारक टार्गेट,बेशिस्त रिक्षाचालकांकडून नियमांची पायमल्ली करणाºयांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:27 PM