सातपूर येथील प्रभाग क्रमांक ९ मध्ये मधील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. यामुळे मोकाट कुत्रे व जनावरे खूप मोठ्या प्रमाणात तेथे जमा होत असून अनेक लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी जखमी केले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. उद्याने भकास होत चालली आहेत. त्यातील ग्रीन जीम मोडकळीस आलेली आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्व रस्ते डांबरीकरण व्हावेत. कार्बन नाका येथे असलेल्या भाजी बाजाराला अधिकृत मंजुरी द्यावी. स्वतंत्र जागेमध्ये मटन मार्केटची उभारणी करावी वेगवेगळ्या ठिकाणी हॉकर्स झोन तयार करण्यात यावेत. प्रभागाला लागून मोठी औद्योगिक वसाहत आहे येथे अवजड वाहनांस प्रवेश बंदी करावी. अनेक स्ट्रीट लाइट हे बंद स्वरूपात असून त्याची तात्काळ दुरुस्ती करून चालू करावी. यासह अनेक समस्या भेडसावत असून त्या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी सविता गायकर, मनीषा गांगुर्डे, संगीता उबाळे, कल्पना बैरागी, प्रियंका गायकर, सदाशिव माळी, दिनकर कांडेकर, करण गायकर, प्रमोद जाधव, महेश आहेर, एमडी शिंदे, सम्राट सिंग, नवनाथ शिंदे, सचिन निकम आदींसह नागरिकांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले.
(फोटो ०९ सातपूर) प्रभाग क्रमांक ९ मधील समस्यांचे निवेदन मनपा आयुक्त कैलास जाधव यांना देताना सविता गायकर, मनीषा गांगुर्डे, संगीता उबाळे, कल्पना बैरागी, प्रियंका गायकर आदी.