शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

निवृत्तिनाथांच्या समाधीला उटीचा लेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 1:30 AM

सलग दुसऱ्याही वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीरायांच्या संजीवन समाधीला परंपरेनुसार शुक्रवारी (दि.७) चंदनाच्या उटीचे लेपन करण्यात आले. दरवर्षी वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे उटीची वारी तथा मिनी निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरत असते. यंदा मात्र, कोरोनामुळे ही यात्रा रद्द करून मोजक्या भाविक व विश्वस्तांच्या उपस्थितीत  हा विधी पार पाडण्यात आला. 

ठळक मुद्देसलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या संचारबंदीमुळे यात्रोत्सव रद्द

त्र्यंबकेश्वर : सलग दुसऱ्याही वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीरायांच्या संजीवन समाधीला परंपरेनुसार शुक्रवारी (दि.७) चंदनाच्या उटीचे लेपन करण्यात आले. दरवर्षी वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे उटीची वारी तथा मिनी निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरत असते. यंदा मात्र, कोरोनामुळे ही यात्रा रद्द करून मोजक्या भाविक व विश्वस्तांच्या उपस्थितीत  हा विधी पार पाडण्यात आला. दरवर्षी त्र्यंबकेश्वरला वरुथिनी एकादशीला मोठी  यात्रा भरते, पण मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षीही निवृत्तीनाथ महाराज यांची उटीची वारी प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्र्यंबकला येणाऱ्या वारकरी भाविकांना यात्रेला येण्यापासून परावृत्त करण्यात आले. मात्र, परंपरेप्रमाणे देवाचे दैनंदिन सोपस्कार, पूजा-अर्चा, आरती, पुष्पांजली सोहळा भक्तिभावाने करण्यात आला. शुक्रवारी  दुपारी  टाळ-मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात संत निवृत्तीनाथरायाच्या संजीवन समाधीला थंडगार शीतल व सुगंधी चंदनाच्या उटीचा लेप पुजारी सुरेश गोसावी, जयंत गोसावी, योगेश गोसावी,  ह.भ.प. सच्चिदानंद महाराज गोसावी तसेच मंदिराचे प्रशासक तथा धर्मादाय उपायुक्त कृष्णा सोनवणे, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी  संजय जाधव, विश्वस्त भाऊसाहेब गंभीरे,  के.एम. पाटील,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे,  व्यवस्थापक गंगाराम झोले आदींच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी मोजकेच भाविक उपस्थित होते. चाचणी नंतरच प्रवेशप्रशासनाने उटी सोहळ्याच्या एक दिवस आधी सोहळ्यात सहभागी होणारे अतिथी, मंदिराचे पुजारी तसेच कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुन अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच सहभागी होण्याची परवानगी दिलेली होती. संस्थानने फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण करुन भाविकांना घरबसल्या या सोहळ्याचे दर्शन घडविण्याची सोय केलेली होती.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर