उटीची वारी म्हणजे श्रीसंत श्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची 'मिनी निवृत्तिनाथ यात्रा' मानली जाते. मे महिन्यातील उन्हाच्या तीव्रतेपासून मनुष्यासह पशु-पक्ष्यांना उन्हाचा दाह सहन होत नाही. संत निवृत्तिनाथ महाराज यांनी ७२४ वर्षांपूर्वी आपले अवतार कार्य संपवत त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. तथापि, आजही श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज यांचा आत्मा संजीवन समाधीच्या गुहेत वास करत असल्याच्या श्रद्धा भावनेतून दरवर्षी उटीच्या वारीला लाखो भाविक त्र्यंबकेश्वरी येत असतात. परंतु मागील वर्षी जूनपासूनच कोरोनाचा शिरकाव त्र्यंबकेश्वरमध्ये झाला. मध्यंतरी कोरोनाचा कहर कमी झाला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. परिणामी येत्या शुक्रवारी (दि.७) भरणारी उटीच्या वारीची यात्रा कडक निर्बंधांमुळे रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात संत निवृत्तिनाथ महाराज प्रशासकीय समितीची बैठक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील के. एम. सोनवणे, ॲड. भाऊसाहेब गंभिरे, मुख्याधिकारी संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या उपस्थितीत होऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी प्रमाणेच यंदाही उटीची वारी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी वारकरी भाविक यांना येण्यास बंदी करण्यात आली असून, परंपरेनुसार देवाच्या संजीवन समाधीला चंदनाची शीतल सुगंधी उटी लावण्यात येणार आहे. धार्मिक विधी मोजक्या चार प्रशासकीय विश्वस्त मंडळाच्या सदस्यांसह पुजारी, गोसावी घराण्यातील ३-४ सेवक आदींच्या उपस्थितीत पार पाडण्यात येणार आहे.
इन्फो
परंपरेप्रमाणे मंदिरात यंदाही सप्ताह बसविण्यात आला आहे. चंदनाची खोडे उटी तथा गंध म्हणून उगाळली जात आहेत. दैनंदिन धार्मिक पूजा-आरती विधी सुरू आहेत. दरम्यान, देवाच्या संजीवन समाधीला आतील गाभाऱ्यात उष्णतेचा दाह जाणवू नये म्हणून उटीच्या वारीच्या दिवशी दुपारी १२ वाजेपासून चंदनाचे लेपन केले जाणार आहे. हे लेपन चढविल्यानंतर रात्री १० व वाजता संजीवन समाधीवरील उटीचे लेपन धुण्यास सुरुवात होते आणि हीच उटी भाविक-वारकरी यांच्या अंगावर शिंपडली जाते. अनेक भाविक उटीचा प्रसाद आपल्या गावी नेत असतात. मात्र, यंदा या विधीला भाविक मुकणार आहेत.
फोटो - ०३ त्र्यंबक उटी-१
संत निवृत्तिनाथांच्या समाधीला उटीचे लेपन करण्यासाठी पंचमीपासून दशमीपर्यंत चंदनाची खोडे उगाळण्याचे काम पुजारी गोसावी घराण्यातील सर्वच स्त्री-पुरुष करत आहेत.
फोटो - ०३ त्र्यंबक उटी २
समाधीला केलेले उटीचे लेपन (संग्रहित)
===Photopath===
030521\03nsk_9_03052021_13.jpg~030521\03nsk_10_03052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०३ त्र्यंबक उटी-१~फोटो - ०३ त्र्यंबक उटी २