नाशिक : समृद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीत मुंबईपासून नागपूरपर्यंत मध्यस्थ, दलालांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार घडत असताना नाशिक जिल्ह्यातही सिन्नर व इगतपुरी येथे शेतकºयांना त्यांच्या संपादित जमिनींचे मूल्यांकन ठरवून देताना मोठ्या प्रमाणावर ‘गोलमाल’ झाल्याच्या घटना उघडकीस येत असून, यात शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन जागेची मोजणी करण्यापासून ते शेतातील वस्तूंची नोंद घेणाºया पंचनाम्यात हेराफेरी करण्यात आली आहे. ज्या शेतकºयांनी पैसे दिले त्यांना ‘मालामाल’ करण्याची भूमिका बजावणाºया मध्यस्थांनी प्रशासनातील कर्मचारी, अधिकाºयांना हाताशी धरून सर्वांचेच ‘चांगभलं’ करून घेतले आहे.या संदर्भात तक्रार करणाºयांचे तोंड बंद करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करण्यात येत असून, शेतातील वस्तूंचा फेर पंचनामा करण्याची मागणी करणाºयांना प्रसंगी न्यायालयात जाण्याच तर काहींना शेतातील विहिरी बुजवून टाकण्याचा सल्ला दिला जात आहे. मूल्यांकन करताना झालेल्या चुका उघड होऊ नये म्हणून तक्रारदाराला समृद्धीच्या ठेकेदाराला सांगून रोजगार मिळवून देण्याचे आमिषही दाखविले जात आहे. उदाहरणादाखल इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील गट नंबर ३५९ मध्ये गमतीशीर प्रकार घडला आहे.पाच भावांची वाटणी झालेल्या एकाच गटातून समृद्धी मार्ग जात असताना ज्या गटात पाइपलाइन व पाण्याची टाकी आहे, त्याऐवजी दुसºया गटात पाइपलाइन व विहीर दाखविण्यात आली. एव्हढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तर संबंधिताना त्याचा मोबदलाही अदा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गटाच्या सातबारा उताºयावर जलसिंचनाचे क्षेत्र असल्याची कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही, असे असतानाही संबंधिताना लाखो रुपयांचा मोबदला अदा करण्यात आला, मात्र पैसे न दिल्याच्या कारणावरून ज्या गटात पाइपलाइन व टाकी बांधलेली आहे, त्या जागामालक किरण पांडुरंग भोसले यांचे मात्र आता ऐकून घेण्यासही नकार दिला जात आहे. असाच काहीसा प्रकार बेलगाव तºहाळे येथे घडला असून, संयुक्त मोजणीत खंडू गोपाळ आव्हाड याच्या शेतात विहीर व पाइपलाइनचा उल्लेख करणाºया प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी मोबदला अदा करण्याच्या मोबदल्यात ‘मूल्यांकना’ची मागणी केली, त्याची पूर्तता न झाल्यास विहीर व पाइपलाइनचा मोबदला देण्यास नकार दिला आहे.संबंधित अधिकाºयांकडे दाद मागितली असता, त्यांनी पाइपलाइन काढून घेण्याची व विहीर समृद्धीच्या ठेकेदाराकडून बुजवून घेण्याचा सल्ला दिला आहे.जागामालक कंगाल, भूमिहीन मालामालसमृद्धी महामार्गाच्या जागेचे सर्वेक्षण करण्यापासून ते जागा मोजणी, तलाठ्याचा दाखला, जमिनीचे मूल्यांकन, त्यातील झाडे, विहिरी, पाइपलाइन, घर, गोठ्याचे मूल्यांकन, सातबारा उतारा, दुय्यम निबंधकांकडे नोंदणी, ना हरकत दाखला, नातेवाइकांचे संमतीपत्र अशा प्रत्येक टप्प्यावर जागा मालकाला ‘टक्केवारी’ वाटावी लागली आहे. जागेचे क्षेत्र, त्याला मिळणाºया मोबदल्याच्या रकमेच्या हिशेबावर लक्ष ठेवून असलेले मध्यस्थ, दलाल व सरकारी कर्मचारी, अधिकाºयांनी पावलोपावली पैसे घेतले असून, अनेक शेतकºयांनी ‘टक्केवारी’ वाटण्यासाठी व्याजाने पैसे घेत चुकारे केले आहे. त्यामुळे जागा मालक कंगाल झाले, मात्र भूमिहीन असलेली सरकारी यंत्रणा मालामाल झाली आहे.
‘समृद्धी’च्या जागा मूल्यांकनात ‘गोलमाल’ उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:12 AM
समृद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीत मुंबईपासून नागपूरपर्यंत मध्यस्थ, दलालांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार घडत असताना नाशिक जिल्ह्यातही सिन्नर व इगतपुरी येथे शेतकºयांना त्यांच्या संपादित जमिनींचे मूल्यांकन ठरवून देताना मोठ्या प्रमाणावर ‘गोलमाल’ झाल्याच्या घटना उघडकीस येत असून, यात शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन जागेची मोजणी करण्यापासून ते शेतातील वस्तूंची नोंद घेणाºया पंचनाम्यात हेराफेरी करण्यात आली आहे.
ठळक मुद्देअन्याय : विहीर, पाइपलाइन नसलेल्यांना मोबदला