नाशिक : पोलीस दलात काम करणाºया राज्यातील पोलिसांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाने दूरशिक्षणाचे द्वार खुले केले असून, पोलिसांना पदवी आणि पदविका मिळवून देण्यासाठीचा विशेष अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केला आहे. यासंदर्भात मुक्त विद्यापीठ आणि पोलीस दल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या अभ्यासक्रमामुळे पोलिसांना दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या व्यस्त कामाचा विचार करून अभ्यासक्रम आणि वर्गाचे नियोजन करण्यात आले आहे.मुक्त विद्यापीठाच्या मुख्यालयातील यश इन येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, कुलसचिव दिनेश भोंडे, महाराष्टÑ पोेलीस दलातर्फे सहायक पोलीस संचालक डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपसंचालक नंदकुमार ठाकूर आणि तिरुपती काकडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या पुढाकारातून २०१० मध्ये समाजातील विविध घटकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम सुरू केला होता. पोलिसांसाठी देखील पोलीस प्रशासन आणि एमबीए (पब्लिक पॉलिसी मॅनेजमेंट) हे शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आले होते.मागील महिन्यात भारतीय सेना दलाबरोबर सामंजस्य करार करून महाराष्टÑातून सेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांसाठी बी.ए. शिक्षणक्रम उपलब्ध करून दिला आहे. आता पोलिसांबरोबर करार करण्यात आला असून, पोलीस महासंचालक सतीश माथूर, अपर पोलीस महासंचालक डॉ. जगन्नाथन यांनी काही सामंजस्य करार होण्यासाठी विशोष प्रयत्न केले. याशिवाय संगणकशास्त्र विद्या शाखेचे संचालक प्रा. माधव पळशीकर यांनीही शिक्षणक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्टÑ पोलीस दलातर्फे पोलीस प्रबोधिनीचे सहायक संचालक डॉ. जालिंदर सुपेकर, उपसंचालक नंदकुमार ठाकूर, आणि तिरुपती काकडे यांनी स्वाक्षरी केल्या तर विद्यापीठातर्फे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी सूत्रसंचालन डॉ. उमेश राजदेरकर यांनी केले. या सामंजस्य कराराच्या अंतर्गत बी.ए. (पोलीस प्रशासन) हा शिक्षणक्रम पोलीस शिपायांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पोलिसांसाठी मुक्त विद्यापीठाचे द्वार खुले सामंजस्य करार : सेना दलानंतर आता पोलिसांसाठी शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:47 AM
पोलीस दलात काम करणाºया राज्यातील पोलिसांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाने दूरशिक्षणाचे द्वार खुले केले असून, पोलिसांना पदवी आणि पदविका मिळवून देण्यासाठीचा विशेष अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केला आहे. यासंदर्भात मुक्त विद्यापीठ आणि पोलीस दल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
ठळक मुद्देअभ्यासक्रमामुळे पोलिसांना दिलासाअभ्यासक्रम आणि वर्गाचे नियोजनसैनिकांसाठी बी.ए. शिक्षणक्रम उपलब्ध