शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

उघडे रोहीत्र, लोंबकळणाऱ्या तारा बनताहेत मृत्युचे सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 8:02 PM

खेडलेझुंगे : कोळगांव, रु ई, खेडलेझुंगे, धारणगांववीर व खडक, सारोळेथडी परिसरात विज वितरण कंपनीच्या लोंबकळणाºया तारांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहे. असे असतांनाही विज वितरण कंपनीकडून अद्याप पावेतो कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

खेडलेझुंगे : कोळगांव, रु ई, खेडलेझुंगे, धारणगांववीर व खडक, सारोळेथडी परिसरात विज वितरण कंपनीच्या लोंबकळणाºया तारांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहे. असे असतांनाही विज वितरण कंपनीकडून अद्याप पावेतो कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.या परिसरामध्ये विजेचा शॉक बसुन एप्रिल मध्ये बाळासाहेब पाठक आणि मागील महिन्यात कोळगांव येथील गोविंद गवळी तर शिरवाडे वाकद येथील लिलाबाई वाघ यांनी जीव गमावला आहे. याघटनेसंदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्ह्यांची नोंद देखील करण्यात आलेली आहे. तरीही विज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचारी वर्गाकडुन गांभीर्याने घेतल्याचे दिसुन येत नसल्याचे चित्र दिसत आहे.कोळगांव रोडलगत विक्र म घोटेकर यांच्या शेतात असलेले रोहीत्र हे उघड्या स्वरुपात आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना घडु शकते. यासारखे अनेक शेतकºयांच्या शेतावरील, रोडच्या लगत असलेल्या डिपींच्या अवस्था अत्यंत दयनीय आहे. डीपीचा पत्रा सडलेल्या स्वरु पात आहे.पावसाचे आगमन सुरु झाले की विज वितरण कंपनीची बत्ती गुल होते, ती ८-१५ दिवसांनी पुर्ववत होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला पाणीपुरवठा सारख्या अत्यंत महत्वाचे विभागतील कामकाज करणे अवघड होवुन बसते.अधिकारी वर्गाशी संपर्क केला असता होवुन जाईल, माणसं पाठविलेली आहेत, आवाज येत नाही, बघुन घेतो, तुम्हाला का माहीती द्यावी या सारखी उत्तरे ऐकावयास मिळातात असे स्थानिक रहीवाशांकडुन सांगितले जाते.धारणगांव वीर येथील गणेश बोडके यांच्या शेतातुन दोन पोलमधील विद्युत तारा इतक्या प्रमाणात लोंबकळलेल्या आहेत की, त्यावर बसुन झोका खेळता येईल. जमीनीपासुन अवघ्या ४-५ फुट अंतरावर तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शेती करणे अत्यंत जिकिरीचे झालेले आहे. शेतीची कामे करतांना डिपी आॅफ केली जाते. शेती काम होईपर्यंत घरातील एक सदस्य डीपीजवळ बसवुन ठेवावा लागतो. याबाबत संबंधीत वायरमन यांना वारंवार सांगुनही काही उपयोग झाला नाही, असे बोडके यांनी सांगीतले.धारणगांववीर येथील कृष्णा सोनवणे यांच्या तर घरावर तारा लटकत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हक्काचे घर असुनही जीव मुठीत धरु न रहावे लागत आहे.याबाबत वारंवार लेखी अर्ज करु नही विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी डोळे झाक करत आहे. घरावरील तारा काढुन घेण्यासाठी लागणारा विद्युत पोल हा परिसरातील काम पुर्ण झाल्यानंतर तिरपा झालेला पोल हा स्वखर्चाने आणुन सरळ करु न ठेवलेला आहे. या पोलासाठी आर्थिक देवाण-घेवाणही झालेली असुन देखील अद्याप पावेतो सदरचा पोल रोवुन विद्युत तारा घरावरु न स्थलांतरीत केलेल्या नाहीत. त्यामुळे सदरचा शेतकºयाने नाराजी व्यक्त केली आहे.धारणगांव खडक येथील शेतकरी केशव दत्तात्रय पेंढारे यांच्या शेतात मागील मिहन्याच्या सुरवातीला झालेल्या वादळी पावसात पोल पडलेला आहे. त्याची दुरु स्ती अद्याप पावेतो करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी शेती कामे करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच केशव पेंढारे यांचे बायपास झालेले आहे. विहीरीला भरपुर पाणी असुनही त्यांना पाणी काढता येत नाही. जमिनीपासुन अवघ्या दोन फुटापर्यंत तारा झोका घेत आहेत. याबाबत लेखी देवुनही विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी कामात कुचराई करत आहेत.बोरमाथा वस्ती ते खेडलेझुंगे रस्त्यावर डिपी असुन तीची अवस्थ अत्यंत दयनीय झालेली आसुन त्या डिपी ते पोलामधील तारा लोंबकळत असल्याने तात्पुर्ती उपाय योजना म्हणुन बांबु लावण्यात आलेला आहे. या रस्त्याने विद्यार्थी, रहिवाशी, शेतकºयांची मोठी वर्दळ असते. याबाबत वारंवार कळवुनही त्याकडे अधिकारी डोळेझाक करीत आहे.- प्रमोद गिते, शेतकरी.माझ्या शेतात या दोन पोल मधील विद्युत तारांचे झोळ मागील वर्षापासुन असुन याबाबत संबंधीत वायरमन यांना वारंवार कळवुनही सदरचे काम अपुर्ण स्थितीत आहे. त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. कर्मचाºयांकडुन नेहमीच उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने अपमानास्पद वागणुक मिळाली.- गणेश बोडके, शेतकरी, धारणगांववीर.