नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत चालणारा काळाबाजार रोखण्यासाठी शासन पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, त्यावर मात करीत रेशन दुकानदारांनी आपला गोरख धंदा सुरूच ठेवला असून, दोन दिवसांपुर्वी रेशनचे धान्य टेम्पोमध्ये टाकून खुल्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनीच रेशन दुकानदाराला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.दिंडोरी तालुक्यातील चामदरी येथे हा प्रकार घडला आहे. राज्य सरकारने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ‘पॉस’यंत्राच्या सहाय्यानेच धान्य वाटप करण्याची सक्ती सर्व रेशन दुकानदारांना केली असून, त्यामागे पात्र प्रत्येक शिधापत्रिकाधारकालाच धान्य मिळावे हा हेतू असला तरी, चामदरी येथील सोमनाथ वामन गरूड या दुकानदाराने गेल्या तीन महिन्यापासून पॉस यंत्राच्या आधारे धान्याचे वाटप केले. त्यामुळे शिल्लक असलेले धान्य दुकानात पडून असल्याने सदरचे धान्य त्याने खुल्या बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी शनिवारी सायंकाळी एका टेम्पोत टाकले. सदरची बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी पाळत ठेवून दुकानदार धान्य नेत असतानाच त्याला पकडून पोलिसांना त्याची खबर दिली. पोलिसांनी १६ क्विंटल धान्यासह टेम्पो व दुकानदार गरूड यास ताब्यात घेवून त्याच्या विरोधात जिवनावश्यक वस्तु काळाबाजार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून ‘पॉस’ यंत्राच्या सहाय्याने शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात असून त्यामुळे धान्याच्या काळाबाजाराला चाप बसल्याचा दावा केला जात असताना त्यावरही मात करून दुकानदाराने काळाबाजार करण्याचा हा पहिलाच प्रकार घडला आहे. यापुढे रेशन दुकानदारांवर वेगवेगळ्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सांगितले.
रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:19 PM
दिंडोरी तालुक्यातील चामदरी येथे हा प्रकार घडला आहे. राज्य सरकारने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ‘पॉस’यंत्राच्या सहाय्यानेच धान्य वाटप करण्याची सक्ती सर्व रेशन दुकानदारांना केली असून, त्यामागे पात्र प्रत्येक शिधापत्रिकाधारकालाच धान्य मिळावे हा हेतू असला तरी, चामदरी येथील सोमनाथ वामन गरूड
ठळक मुद्देदुकानदाराविरूद्ध गुन्हा : ‘पॉस’ यंत्र निष्प्रभ?१६ क्विंटल धान्यासह टेम्पो व दुकानदार गरूड ताब्यात