सिडको : रस्ता डांबरीकरणासाठी महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे रस्ता रूंदीकरण करणार नाही. यापुढील काळात शहरातील मनपाच्या ताब्यातील उद्यान तसेच मोकळ्या जागांवर बांधकाम होणार नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅक येथे शनिवारी (दि.२०) सकाळी वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रस्त्यावर साचलेला पालापाचोळा, रस्त्याची साफसफाई, बंद पथदीप यांसह मनपाशी निगडित विविध प्रकारच्या ६० हून अधिक समस्या नागरिकांनी मांडल्या. यात जॉगिंग ट्रॅकच्या जागेत असलेले अनधिकृत गॅरेज त्वरित हटविण्यात यावे तसेच ज्या ठिकाणी वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणीच असलेल्या एका जिममध्ये येणाऱ्यांची वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने यात बदल न झाल्यास जिम मालकावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यावेळी आयुक्तांनी नवीन रस्त्यांची कामे होणार नाही, असे अगोदरच स्पष्ट केले. तसेच नाल्याच्या लगत संरक्षण भिंत बांधण्यात येणार नसून, रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी नाला बंदिस्त करता येणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी गोविंदनगर येथील नव्याने विकसित झालेल्या खांडेनगर भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, परिसराची साफसफाई केली जात नसल्याचे श्रेयस घुले यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावर आयुक्तांनी रस्त्यांची त्वरित डागडुजी करण्याचे तसेच दैनंदिन साफसफाई करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. तसेच सिद्धिविनायक कॉलनी भागात साफसफाई होत नसून मोकळ्या भूखंडावर वाढलेल्या गाजर गवतामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. याबरोबरच जॉगिंग ट्रॅकवर होणाºया स्वच्छतेची वेळ बदलण्यात यावी. तसेच सागर स्वीट ते सत्यम स्वीट दरम्यानचा रस्ता दुरुस्त करावा. सिडको भागातील बहुतांशी ठिकाणी रस्त्यावर साचलेला पालापाचोळा घंटागाडीचालक घेत नसून, याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर आयुक्तांनी सदरचा पालापाचोळा हा घंटागाडीचालकांनी घेण्याबाबत संबंधित विभागास सूचना दिल्या.नागरिकांनी आयुक्तांपुढे वाचला तक्रारींचा पाढासिडको भागातील बहुतांशी उद्यानांची दयनीय अवस्था झाली असून, उद्यानांची देखभाल होत नाही. न्यू इरा शाळेच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या जागेबाबतही तक्रारी प्राप्त झाल्या. याबाबत सिडको उद्यान विभागाचे प्रमुख असलेली चौकट यांना रेकॉर्डवर घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. कर्मयोगीनगर येथील चौफुलीवर दररोज अपघात होत असून, याठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्याची मागणी झाल्यांनंतर आयुक्तांनी सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबत हिरवा कंदिल दिला.गोविंदनगर भुयारी मार्ग ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाºयांचे प्रमाण वाढले असून, यामुळे वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. यासंदर्भात, व्यावसायिकांचे वाहनासह साहित्य जप्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
खुल्या जागा मोकळ्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:17 AM
रस्ता डांबरीकरणासाठी महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे रस्ता रूंदीकरण करणार नाही. यापुढील काळात शहरातील मनपाच्या ताब्यातील उद्यान तसेच मोकळ्या जागांवर बांधकाम होणार नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
ठळक मुद्देतुकाराम मुंढे : साठहून अधिक तक्रारींची नोंद