शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

शस्त्रास्त्रांसह नाण्यांचा खजिना खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:57 AM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील शिवराईपासून ब्रिटिशकालीन नाण्यापर्यंत अन् राजस्थानमधील राजा-राणी तलवारीपासून चिलखत फाडणाऱ्या खंजीरपर्यंत विविध शस्त्रास्त्रे व नाण्यांचा खजिना सरकारवाडा या ऐतिहासिक पुरातन वास्तूमध्ये शहरातील संग्राहकांकडून खुला करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरकारवाडा : ‘जागतिक वारसा’ सप्ताहनिमित्त इतिहासप्रेमींसाठी पर्वणी

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील शिवराईपासून ब्रिटिशकालीन नाण्यापर्यंत अन् राजस्थानमधील राजा-राणी तलवारीपासून चिलखत फाडणाऱ्या खंजीरपर्यंत विविध शस्त्रास्त्रे व नाण्यांचा खजिना सरकारवाडा या ऐतिहासिक पुरातन वास्तूमध्ये शहरातील संग्राहकांकडून खुला करण्यात आला आहे.निमित्त आहे, जागतिक वारसा सप्ताहचे. राज्य पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक कार्यालय, प्रादेशिक वस्तू संग्रहालयाच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. नूतनीकरण सुरू असलेल्या सरकारवाड्याच्या वास्तूचे हळूहळू रूपडे पालटत असून या ऐतिहासिक पुरातन वास्तूत भरविण्यात आलेल्या शस्त्रास्त्रे व नाण्यांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने नाशिककरांना या जुन्या सरकारवाड्याच्या नव्या रूपड्याचे सौंदर्यही अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रदर्शनामध्ये स्थानिक संग्रहाकांनी सहभाग नोंदविला आहे. चेतन राजापूरकर यांचा नाणी संग्रह, तर आनंद ठाकूर यांचा कट्यारपासून भाल्यापर्यंतचा शस्त्रांचा संग्रह तसेच अनिता जोशी यांचा पोथ्यांचा संग्रह, तर रवींद्र वामनाचार्य यांचे टपाल तिकीट व कव्हरचा संग्रह तसेच ‘मिसळ कट्टा’ नावाने सुरू असलेल्या चित्रकारांच्या संघटनेमधील सदस्यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या विविध चित्राकृती या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. सुभाष पगारे यांनी इंग्रजकाळातील चांदीच्या नाण्यांचा संग्रह, तर अ‍ॅड. राजेश जुन्नरे यांनी मुघलकालीन नाण्यांचा खजिना मांडला आहे. हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (दि.२५) सकाळी दहा ते संध्याकाळी पाच यावेळेत खुले राहणार असून, इतिहासप्रेमींनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन प्रादेशिक वस्तू संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहणे यांनी केले आहे.बाबर ते शहाजहॉँनच्या काळाची नाणीबाबरपासून थेट शहाजहॉँनपर्यंत होऊन गेलेल्या विविध मुघल बादशाहांच्या कालावधीमधील नाणीही येथे पहावयास मिळतात. तब्बल १७हून अधिक मुघल राजांच्या कालावधी त्यांची माहिती व नाण्याची विस्तृत माहितीसह नाणे प्रदर्शित करण्यात आले आहेत. एकूणच या प्रदर्शनात शस्त्रे, नाणी, हस्तलिखिते, चित्राकृती, टपालतिकिटे पहावयास मिळतात.शिवकालीन ‘होन’ अन् शिवराई२.७८८ग्रॅम वजनाचे व १.३२ व्यासाचे शिवकालीन प्रसिद्ध सुवर्ण नाणे ‘होन’देखील प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. या नाण्याच्या एका बाजूला ‘शिव छत्रपती’, तर दुसºया बाजूला ‘श्री राजा शिव’ अशी अक्षरे कोरलेली आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या वेळी हे नाणे प्रचलित होते. शिवकालीन नाण्यामध्ये प्रामुख्याने हाताळले जाणारे चलन ‘शिवराई’देखील या प्रदर्शनात पहावयास मिळतात. शिवरायांच्या काळापासून तर पेशवेकाळापर्यंत ‘शिवराई’ला चलनाची मान्यता होती. ‘छत्रपती पैसा’ या नावाने शिवराई ओळखली जाते. हा संग्रह अनंत धामणे यांनी नाशिककरांपुढे खुला केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहास