नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा श्रमसेवा पुरस्कार नाशिकच्या स्मशानभूमीत काम करणाºया सुनीता पाटील यांना, तर रुख्मिणी पुरस्कार मुंबईत उपेक्षित वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी शुक्रवारी (दि. २३) या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली. याशिवाय विशाखा काव्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून ठाणे येथील सुशीलकुमार शिंदे, नाशिक जिल्ह्यातील रवींद्र कांगणे आणि सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांचा समावेश आहे. आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणाºया महिलेलाकिंवा महिलांच्या संस्थेला श्रमसेवा पुरस्कार दिला जातो. येथील स्मशानभूमीत काम करणाºया सुनीता पाटील यांना हा पुरस्कार दिला जाणार असून, २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.कवी कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या नावाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणाºया विशाखा प्रथम काव्य पुरस्कारासाठी ठाणे येथील नवोदित कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘आत्महत्या करायचं म्हणतंय’ यांची निवड करण्यात आली आहे, तर द्वितीय पुरस्कार ‘येठण’ काव्यसंग्रहासाठी सिन्नर येथील रवींद्र कांगणे यांना देण्यात येणार आहे. सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांच्या ‘अस्तित्वाचा अजिंठा कोरताना’ या काव्यसंग्रहास तिसºया क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी (दि.२७) नाशिक शहरातील गंगापूररोडवरील हॉटेल शगून येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कवी किशोर पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले आहे.८४ महिलांना मिळवून दिला रोजगारअतिशय मागासलेल्या वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा मल्लू गुडीलू यांना रुख्मिणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी समाजातील ११२ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले आहे. तसेच समाजातील महिलांचे ५८ बचत गट स्थापन केले असून त्या माध्यमातून ८४ महिलांना मुंबईतील हॉटेल्सना चपात्या बनवून देण्याचा रोजगार मिळवून दिला आहे.
मुक्त विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:44 AM