नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय नेटबॉल स्पर्धेचे उद्Þघाटन मनमाड नगरपालिका सदस्य बबलू पाटील यांनी केले. या स्पर्धेत पुणे विद्यापीठातील नाशिक, पुणे शहर, पुणे ग्रामीण, नगर असे चार संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम, प्राचार्य डॉ. एस. आय. पटेल, शैलेंद्र कांबळे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यात नाशिक संघाने पुणे शहराचा पराभव केला, तर दुसरा सामना नगर-पुणे ग्रामीण यांच्यात झाला. यात पुणे ग्रामीणने नगर संघाचा पराभव केला, तर तिसरा सामना नगर विरूध्द नाशिक यांच्यात झाला. यात नाशिक संघाने नगर संघावर विजय मिळवला. पंच म्हणून अश्पाक शेख व स्वप्निल कर्पे यांनी,तर गुणलेखन व टाइम किपर म्हणून संकेत कदम व अनिल औशिकर यांनी काम पाहिले.
आंतरविभागीय नेटबॉल स्पर्धेचे उद्Þघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 16:12 IST
नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय नेटबॉल स्पर्धेचे उद्Þघाटन मनमाड नगरपालिका सदस्य बबलू पाटील यांनी केले. या स्पर्धेत पुणे विद्यापीठातील नाशिक, पुणे शहर, पुणे ग्रामीण, नगर असे चार संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम, प्राचार्य डॉ. एस. आय. पटेल, शैलेंद्र कांबळे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
आंतरविभागीय नेटबॉल स्पर्धेचे उद्Þघाटन
ठळक मुद्देयावेळी पुणे विद्यापीठाचे मनोहर कुंजीर कक्षाधिकारी विद्यापीठ क्र ीडा मंडळ हे उपस्थित होते. पहिला सामना पुणे शहर विरूद्ध नाशिक संघामध्ये झाला.