लासलगाव - केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका खरेदीकेंद्राचे उद्घाटन निफाड उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले .खुल्या बाजारात मक्याचे भाव कमी असल्यामुळे मका खरेदी केंद्र सुरू करावे अशी शेतकºयांची मागणी असल्याने सदरचे केंद्र सुरू करण्यात आले. या माध्यमातून मका उत्पादक शेतकºयांना चांगला भाव मिळेल. एक हजार चारशे पंचवीस रु पये प्रति क्विंटल या दराने या केंद्रावर माका खरेदी केली जाणार आहे. यावेळी निफाड तहसीलदार विनोद भामरे, जिल्हा परिषद सदस्य डि के जगताप, विनोद भामरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही एस इंगळे, बाजार समितीचे सचिव बी.वाय होळकर, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष नितीन घोटेकर व संचालक राजाराम मेमाणे जनार्दन जगताप सुरेश रायते,शंकरराव कुटे राजेंद्र दरेकर एल के बडवर, अनिल घोटेकर, राजाराम दरेकर, काशिनाथ मापारी आदी उपस्थित होते .
मका खरेदी केंद्राचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 4:54 PM