शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

लोकार्पण : सिनेअभिनेत्यांच्या उपस्थितीत

By admin | Published: December 28, 2016 1:13 AM

नूतनीकृत ‘बॉटनिकल गार्डन’ नाशिककरांसाठी खुलेराज यांच्या पाठीशी नाना !

नाशिक : मनसेला यंदाची निवडणूक कठीण असल्याची चर्चा असली तरी प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर यांनी मात्र ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दाखवले आहे. पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या वनौषधी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राज यांच्या कल्पक कार्यशैलीचे कौतुक करतानच लोकांना इतर पक्ष अजमावू दे, शेवटी राज यांचीच सत्ता असेल, असे आश्वस्त केले. नाशिक महापालिका आणि टाटा ट्रस्टच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या ३२ एकर परिसरातील वनऔषधी उद्यानाच्या लोकार्पण सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभापती सलीम शेख, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, राहुल ढिकले, टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे आदि उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांच्या हस्ते वनऔषधी उद्यानाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उद्यानाच्या भव्यतेविषयी बोलताना राज ठाकरे यांनी केलेल्या नवनिर्माणाचे कौतुक केले. ते म्हणाले की, असे उद्यान राज्यातील इतर शहरात कुठेच नाही. आता नाशिककरांवर त्यांची देखभालीची जबाबदारी आहे. खरे तर राज हे नेहमीच उत्कृष्ट कलाकृती साकारण्यात प्रयत्नशील असतात. मला इतर राजकीय पक्षांविषयी माहीत नाही. मात्र राज याच्या संकल्पनेतून साकार होणारी वास्तू विशेष असते. त्यामुळे इतरही शहरांमध्ये त्याची सत्ता यावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच लोकांना इतर पक्ष आजमावू दे, कारण सरतेशेवटी सत्ता राज यांच्याकडेच येईल, असेही नाना पाटेकर म्हणाले. यावेळी त्यांनी शहीद जवानांविषयी बोलताना म्हटले की, १६ वर्षांत जे घडले नाही ते गेल्या आठ दिवसांमध्ये घडले. आपले ३०३ जवान शहीद झाले असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मिझोराम, अरुणाचल या राज्यांमध्ये चार शाळा उभारण्यात याव्यात, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून केली गेली. जेव्हा मी ही गोष्ट राज याला सांगितली तेव्हा त्याने लगेचच आपण शाळा उभारूयात असे म्हटले. राजा यांचा हाच स्वभाव मला भावला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी वनऔषधी उद्यानाच्या नूतनीकरणात योगदान दिलेल्या वनविभाग महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रवीण चव्हाण, टाटा ट्रस्टचे दीपशिख सुरेंद्रन, स्नेहा डिजलकर, विराज डावरे, संजय डापके, सुभाष टकले, पंकज इसनगर आदिंचा सत्कार केला. यावेळी मनसेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. (प्रतिनिधी)