नाशिक : कोरोनामुळे लॉकडाउन काळात जनरल स्टोअर्स, बांधकाम साहित्य आणि अन्य दुकानांबरोबर फरसाण आणि मिठाईची दुकानेदेखील बंद होती. परंतु आता बहुतांश दुकाने खुली झाल्याने फरसाण आणि मिठाईच्या दुकानांमध्येदेखील गर्दी दिसून येत आहे. मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नसल्याने कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, म्हणून स्वीट दुकानदारांनी व ग्राहकांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.दरम्यान, लॉकडाउनच्या काळात अनेक सेवाभावी सामाजिक संस्थांनी आणि संघटनांनी ठिकाणी गोरगरीब आणि गरजूंना मिठाईचे वाटप केले, तसेच सणासुदीच्या काळात गोडपदार्थांचे पार्सल मागविण्यात आले होते. त्यामुळेच दुकानदारांना काहीसा आर्थिक आधार मिळाला होता.या काळात बेकरी सुरू होत्या. मात्र स्वीट दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली होती. काही सामाजिक संस्थांनी गरजू गरिबांना काही प्रमाणात अन्नदान केले. तसेच वडापाव, समोसा, कचोरी, लाडू, जिलेबी, बर्फी आदी गोड पदार्थांचे वाटप केले. त्यामुळे काही प्रमाणात मिठाई दुकानदारांना दिलासा मिळाला होता.
मिठाईची दुकाने उघडल्याने खवय्यांची गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:34 PM