नाशिकरोड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रस्ता दुभाजकामध्ये लावलेल्या मोठ्या मार्गदर्शक फलकाच्या खांबाचे फाउंडेशनचे प्लेट लावलेले तीन नटबोल्ट अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याने इतर नटबोल्ट ढिले झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सदर दिशादर्शक फलक धोकादायक स्थितीत हलत होता. त्या ठिकाणाहून जाताना मंगळवारी सदर बाब मनपा उपअभियंत्यांच्या लक्षात आल्याने तातडीने योग्य ती दुरुस्तीकेल्याने भविष्यात घडणारी दुर्घटना टळली.महानगरपालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी नागरिकांना व बाहेरगावच्या प्रवाशांच्या माहितीसाठी मोठ्या आकाराचे निळ्या रंगाचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. नाशिकरोड बसस्थानकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रस्ता दुभाजकांमध्ये उंच एका खांबावर लांबलचक दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. रेल्वे-बसस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना त्या मार्गदर्शक फलकामुळे चांगली मदत होते.मनपा बांधकाम उपअभियंता नीलेश साळी मंगळवारी सायंकाळी ५.४५च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने जात असताना हवेमुळे सदर मार्गदर्शक फलक धोकादायक स्थितीत हलताना दिसून आला.साळी यांनी लागलीच गाडी थांबवून मार्गदर्शक फलकाच्या उंच खांबाचे खाली फाउंडेशनमध्ये लावलेले तीन नटबोल्ट अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच इतर १७ नटबोल्टपैकी १०-१२ नटबोल्ट ढिल्ले (अर्धवट खोलून) करून ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे मार्गदर्शक फलकाखालून बस, ट्रक, अवजड वाहने गेल्यास अथवा जोरात हवा आल्यास मार्गदर्शक फलक धोकादायक स्थितीत हलत असल्याचे उघडकीस आले. साळी यांनी सदर बाब तत्काळ आपल्या वरिष्ठांना कळविली.मनपाच्या ठेकेदारामार्फत काढून नेलेल्या तीन नटबोल्टच्या ठिकाणी नवीन नटबोल्ट लावून पुन्हा व्यवस्थित टाईट लावण्यात आले. तसेच ते नटबोल्ट पुन्हा काढू नये म्हणून त्यावर वेल्डिंगचे स्पॉट मारून घट्ट लावण्यात आले. वेळीच सदर धोकादायक स्थिती लक्षात आल्याने भविष्यात घडणारा मोठा अनर्थ टळला.अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीआंबेडकर पुतळ्यासमोरील मार्गदर्शक फलक गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीत हलत असल्याचे परिसरातील व्यापाऱ्यांनी सांगितले. सोसाट्याच्या वाºयात फलक पडतो की काय याप्रमाणे हलत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. भुरटे चोर, भंगार चोर, गर्दुले, व्हाईटनरची नशा करणाºयांनीच हे गैरकृत्य केले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे समोरच पोलीस चौकी व पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल या ठिकाणी असून नटबोल्ट खोलून चोरणारे कोणाच्या निदर्शनास कसे आले नाही, मनपाची वास्तू, फलक, वस्तू आदींबाबत कोठेही धोकादायक स्थिती दिसल्यास मनपाला कळवावे, असे आवाहन मनपा बांधकाम उपअभियंता नीलेश साळी यांनी केले आहे.
लोखंडी कमानीचे नटबोल्ट काढण्याचा प्रकार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:12 AM