सिडको : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास यू.जी.सी. नवी दिल्ली यांच्याकडून व्यावसायिक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत. त्यात फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रिकल अप्लायंसेस, मेंटेनन्स व रिपेअरिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. नाशिकमधील बहुतांश महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रम यांनाही मान्यता मिळाली असल्याने एकूणच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित व रोजगार संधी देणारे शिक्षण घेता येणार आहे.सिडकोसारख्या कामगारवस्तीत आणि परिसरात अंबड-सातपूर-सिन्नर या औद्योगिक वसाहती असल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मुलांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. ६० टक्के प्रात्यक्षिक-कौशल्ये आणि ४० टक्के सामान्य शिक्षण अशी या अभ्यासक्रमाची विभागणी केलेली आहे. या योजनेंतर्गत प्रवेशासाठी वयाची कुठलीही अट नसून किमान शैक्षणिक पात्रता १२वी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.या अभ्यासक्रमासाठी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एम. एस. गिरासे, डॉ. पी. जी. लोके, डॉ. बाळासाहेब पगार, प्रा. अजय निकम, डॉ. राहुल पाटील, प्रा. राजेश झनकर आदींनी प्रयत्न केले. उपप्राचार्य डॉ. अे. के. शिंदे, प्रा. डी. जी. शिंदे, कार्यालयीन अधीक्षक एस. बी. तांबे, आर. आर. गायकर, गणपत गडाख आदी कामकाज पाहत आहे.अनुदानासाठी प्रस्ताव सादरशासकीय धोरणानुसार आरक्षणाचा लाभही या प्रवेशित विद्यार्थ्यांना मिळणार आहे. वावरे महाविद्यालयाने दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव अनुदानासाठी सादर केलेला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुरुवातीला ७५ लाख रुपयांचे अनुदान येणार असून, पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्याने उर्वरित रक्कम मिळणार आहे.
कामगार वस्तीतील मुलांना मिळणार रोजगाराची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:58 PM
सिडको : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास यू.जी.सी. नवी दिल्ली यांच्याकडून व्यावसायिक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत. त्यात फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रिकल अप्लायंसेस, मेंटेनन्स व रिपेअरिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. नाशिकमधील बहुतांश महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रम यांनाही मान्यता मिळाली असल्याने एकूणच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित व रोजगार संधी देणारे शिक्षण घेता येणार आहे.
ठळक मुद्देवावरे महाविद्यालयात कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम मंजूर