नाशिक : लष्करी जवानांना निवृत्तीनंतरही नोकरीच्या जागीच पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या उच्चशिक्षणाची प्रकाशवाट खुली करून देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जवानांसाठी विशेष दूरशिक्षण शिक्षणक्रम विकसित केला असून, संरक्षण मंत्रालय व मुक्त विद्यापीठ यांच्यात गुरुवारी नवी दिल्लीत सामंजस्य करार करण्यात आला. विशेष म्हणजे नव्या शिक्षणक्रमात प्रथमच मागणीनुसार परीक्षा घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयात गुरु वारी (दि.२१) झालेल्या सामंजस्य करारावेळी संरक्षण मंत्रालयातर्फे लेफ्टनंट जनरल अश्वनी कुमार यांच्यासह मनुष्यबळ नियोजन व सुविधाचे लेफ्टनंट जनरल आर. गोपाल आणि मनुष्यबळ सुविधाचे अतिरिक्त संचालक मेजर जनरल सुधाकर जी. यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी, तर मुक्त विद्यापीठातर्फे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे उपस्थित होते. कार्यक्र माचे संयोजन आणि सूत्रसंचालन ब्रिगेडियर नारायणन यांनी केले. सेवेतील जवानांच्या सोयीसाठी मागणीनुसार परीक्षा या नावीन्यपूर्ण संकल्पनेचा समावेश या शिक्षणक्र मासाठी प्रथमच करण्यात आला आहे. त्यानुसार जवानांना स्वत:च्या सोयीनुसार परीक्षा कालावधी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.खास लष्करी दूरशिक्षण शिक्षणक्रमाची रचनाउच्चशिक्षणाची संधी लष्करी जवानांना मिळाली पाहिजे, या दृष्टीने मुक्त विद्यापीठाने खास लष्करी दूरशिक्षण या शिक्षणक्र माची रचना केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयात पसरलेल्या लष्कराच्या तिन्ही दलांच्या तळांवरील जवानांना या अभ्यासक्र माची माहिती कळविण्याची व्यवस्था करण्यात येईल. यासाठी लष्कराची राज्यातील सर्व प्रमुख केंद्रे मुक्त विद्यापीठाची अभ्यासकेंद्रे म्हणून ओळखली जाणार आहेत.
निवृत्त जवानांना मुक्त शिक्षणाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:45 AM