शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लहान शहरांत गृहनिर्माणला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:21 AM

नाशिक : सद्य:स्थितीत भारतात साडेसात लाख कोटींचे बांधकाम सुरू आहे. त्यातील ८६ टक्के रहिवासी व १४ टक्के व्यावसायिक बांधकाम असून, देशातील ९२ टक्के जनता महानगरांव्यतिरिक्त लहान शहरांमध्ये वास्तव्यास आहे. परंतु, अशा शहरांमध्ये आतापर्यंत केवळ ४० टक्केच बांधकाम झाले आहे. त्यामुळे लहान शहरांमध्ये गृहनिर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणातसंधी उपलब्ध असल्याचा सूर महाकॉन २०१८ या राज्यस्तरीय परिषदेत उमटला.

ठळक मुद्देमहाकॉन : दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचा समारोप

नाशिक : सद्य:स्थितीत भारतात साडेसात लाख कोटींचे बांधकाम सुरू आहे. त्यातील ८६ टक्के रहिवासी व १४ टक्के व्यावसायिक बांधकाम असून, देशातील ९२ टक्के जनता महानगरांव्यतिरिक्त लहान शहरांमध्ये वास्तव्यास आहे. परंतु, अशा शहरांमध्ये आतापर्यंत केवळ ४० टक्केच बांधकाम झाले आहे. त्यामुळे लहान शहरांमध्ये गृहनिर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणातसंधी उपलब्ध असल्याचा सूर महाकॉन २०१८ या राज्यस्तरीय परिषदेत उमटला.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील धन्वंतरी सभागृहात शुक्रवारपासून सुरू असलेल्या महाकॉन परिषदेचा शनिवारी (दि.१४) समारोप झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सेटलमेंट आयुक्त व संचालक लॅन्ड रेकॉर्ड एस. चोक्कलिंगम, क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, माजी चेअरमन इरफान रझाक, क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा यांच्यासह बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा, बोमन इरानी, अनुज पुरी, मनोज गौर आदींनी मार्गदर्शन केले. देशात कृषी क्षेत्रानंतर बांधकाम उद्योग सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून, वाढता कर व घटलेला नफा ही या क्षेत्रासाठी चिंतेची बाब आहे. परंतु, सध्याची स्थिती तात्पुरत्या स्वरूपाची असून, ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांनी महाकॉनच्या माध्यमातून व्यक्त केली.बांधकाम क्षेत्रात ब्रँडचे महत्त्व सांगताना इरफान रझाक, सतीश मगर व सुहास मर्चंट यांनी अनेक उदाहरणांसह सदस्यांना मार्गदर्शन केले. दर्जा व विश्वास या सोबतच योग्य संवाद हे ब्रॅँड बनण्यामागचे गुपित असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनीही सभासदांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :businessव्यवसाय