नाशिक : वर्ल्ड स्पेस सप्ताहानिमित्त मविप्र व नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे (यूएसए) निबंध, पोस्टर व मॉडेल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांना थेट इस्रो आणि नासाच्या संशोधकांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. मराठा विद्या प्रसारक समाज व नॅशनल स्पेस सोसायटीच्या (यूएसए) नाशिक शाखेतर्फे संयुक्तरीत्या ४ ते १० आॅक्टोबरदरम्यान ‘वर्ल्ड स्पेस विक’ साजरा करणार असल्याची माहिती मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व यूएसएच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी दिली असून जगभरात असा प्रयोग पहिल्यांना नाशिकमध्येच होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. अंतराळ सप्ताहा दरम्यान आठवी ते बारावी व महाविद्यालयीन अशा दोन गटांत निबंध, पोस्टर व मॉडेल स्पर्धा होणार आहे. निबंध स्पर्धेत स्पेस युनिटस द वर्ल्ड, अंतराळ ही एक संकल्पना आहे. अंतराळाशी संबंधीत विषयांवर विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत निबंध लिहायचे असून ते तीन प्रतींमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कार्यालयात समक्ष येऊन जमा करावे लागणार आहेत.
वर्ल्ड स्पेस सप्ताहानिमित्त नासाच्या संशोधकांशी थेट संवादाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:06 AM