नाशिक : जिल्ह्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नाशिकमध्ये शाश्वत विकासाचा भक्कम पाया उभा राहण्याचे आवश्यकता असून, कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण मुंबई, पुणे या सुवर्णत्रिकोणात आलो तर जिल्ह्याच्या विकासाला चांगली संधी असल्याचे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मांडले. विकासाचा दृष्टिकोन असलेल्या घटकांनी शाश्वत विकासासाठीची दिशा ठरविणे अपेक्षित असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘लोकमत’ नाशिक आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना स्पष्ट केली. नाशिकला विकासाची चांगली संधी असून आपण अजूनही अशा संधींचा पुरेपूर वापर केलेला नाही. मुंबई, पुणे या शहरांनंतर विकासाचे शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते. या शहरांचा विकास तेथील कनेक्टिव्हिटीमुळे झालेला आहे. नाशिकची कनेक्टिव्हिटी काहीशी कमी पडते. याबाबत आपण आता सक्षम होण्याची गरज आहे सुदैवाने समृद्धी महामार्ग, एअरपोर्ट तसेच नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पामुळे संधी चालून आली आहे. त्या माध्यामातून नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे.
कोणत्याही शहराची प्रगती ही तेथील कनेक्टिव्हिटीशी निगडीत असते. मुंबई, पुणे शहराची प्रगती यामुळे झाली असली तरी ही शहरे आता ओव्हरफ्लो झाली आहे, तर नाशिकची कंट्रोल ग्रोथ असल्याने नाशिकला चांगली संधी आहे. आपल्याकडे चांगल्या आयटी इंडस्ट्रीज, ॲग्रो प्रोसेसिंग आणण्याची आवश्यकता आहे. वायनरीच्या बाबतीत जी प्रगती झाली ती कांद्याच्या प्रोसेसबाबत तसेच स्टोरेजबाबत अजूनही सक्षमतेने झालेली नाही. या क्षेत्रात मोठ्या कामाची संधी आहे. फ्रुट प्रोसेसिंगवर मोठे अर्थकारण होत असल्याची उदारहणे आहे त्यादृष्टीने जिल्ह्याला संधी आहे.
नाशिकची शेती, हवामान, द्राक्ष येथील माणसांचे स्वभाव चांगले ही जिल्ह्याची शक्तिस्थळे आहेत, मात्र त्याचा पूर्णक्षमतेने होताना दिसत नाही. आपण अजूनही आपल्या क्षमतांचा पुरेपूर विकास करू शकलेलो नाही. ही संधी आता निर्माण होऊ पाहत आहे. कायमस्वरूपी शाश्वत विकासासाठी जिल्ह्यातील चांगल्या संस्था आणि व्यक्तींने विकासाची दिशा ठरविणे अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. अशी व्यवस्था एकाच छताखाली निर्माण करण्याचे ठरविले असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.
विकासाचा ध्यास असलेली लोकभावना आपल्याकडे आहे. त्यांची दिशा निश्चित झाली तर नाशिकमध्ये शाश्वत विकासाला चांगली संधी आहे. यासाठी व्हिजन असलेली थिंक टँक आणि सपोर्टिव्ह सिस्टम उभारण्याची गरज असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
---इन्फो--
महसुलाचे उदिष्ट पुर्ण करणारा जिल्हा
मागीलवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्याला ५० कोटी अधिक महसुलीचे उद्दिष्ट होते. जिल्ह्याने २४२ कोटींचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करीत विभागात उत्तम कामगिरी केली. कोरेाना संकटातही जिल्ह्याने २२९ कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २५४ कोटी २८ लाखांची अशी एकूण १११ टक्के वसुली करीत विभागात पहिला क्रमांक मिळविला.
सेवा हमी कायद्याच्या कामाचे राज्याच्या सचिवांनी दखल घेतली आहे. शंभरपेक्षा अधिक सेवा या कायद्याच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. साडेदहा हजार सेवा दिल्या. शेतकऱ्यांचे कर्जवाटपातही जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली असून, ३ हजार ४७ कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. पीक विमा योजनेचे १८७ कोटींचे नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिली कोरोनातही कोणताचा परिणाम प्रशासकीय कामावर झाला नाही.
ग