शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

मनसेच्या जागांवर ‘निसटावंतां’ना संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:33 AM

निवडणूक लढविण्याबाबत असलेली द्विधास्थिती संपवून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर आलेल्या मनसेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात १५ जागी निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ८ ते १० जागीच स्वपक्षाचे सक्षम उमेदवार उभे करण्याची पक्षाची सध्याची स्थिती आहे.

नाशिक : निवडणूक लढविण्याबाबत असलेली द्विधास्थिती संपवून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर आलेल्या मनसेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात १५ जागी निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ८ ते १० जागीच स्वपक्षाचे सक्षम उमेदवार उभे करण्याची पक्षाची सध्याची स्थिती आहे. उर्वरित जागांवर प्रामुख्याने अन्य पक्षांकडून तिकीट न मिळालेले असंतुष्ट आणि अन्य पक्षांतून ऐन क्षणी दाखल झालेल्या ‘निसटावंत’ उमेदवारांनादेखील संधी दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत.मनसेने राज्यभरात १०० जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त केला असताना त्यात मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या सुवर्णचतुष्कोनावरच त्यांचा भर राहणार आहे. त्यात नाशिकने २००९ साली तीन आमदार निवडून देत अभूतपूर्व असे यश मिळवून दिले असल्याने मनसेने यंदा नाशिककडून पुन्हा अपेक्षा ठेवली आहे. अनिश्चिततेच्या भोवऱ्यातून बाहेर आल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत मनसेचे राजगड ओसंडून वाहात असल्याचे चित्र बघून राज्यस्तरावरून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा-देखील हुरूप वाढला होता. २०१४च्या निवडणुकीत हातातून नाशिकच्या तिन्ही जागा गमावल्याचे शल्य मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वासह मनसैनिकांच्या मनात कायम आहे. विशेषत्वे या तिन्ही जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले. तसेच स्वत: राज ठाकरे यांच्याकडून मोदी आणि शहा यांच्यावरच प्रहार केले जात असल्याने मनसेकडून भाजपकडून झालेल्या पराभवाची परतफेड हेच मुख्य लक्ष्य ठरविण्यात आले आहे.ग्रामीणला शक्यता अधिकमहानगरात मनसेकडे तिन्ही जागांवर सक्षम उमेदवार असून, त्यांच्यातूनच अंतिम निवड केली जाणार आहे. मात्र, ग्रामीणच्या बारा जागांपैकी सर्व जागांवर मनसकडे सक्षम उमेदवार नाहीत, याची वरिष्ठ नेतृत्वालादेखील जाणीव आहे. त्यामुळेच मनसेकडून उमेदवारांची यादी तयार करताना अन्य पक्षियांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे दमदार असंतुष्ट गळाला लागतील, त्यांचादेखील विचार होण्याची शक्यता आहे. अर्थात अशा निसटावंतपेक्षा जुन्या निष्ठावंतांनाच ग्रामीणमध्ये देखील उमेदवारी मिळावी, हीच त्यांची अपेक्षा आहे. मात्र, मनसेच्या कार्यशैलीप्रमाणे साहेब ठरवतील तोच आपला उमेदवार असे मानून कार्यकर्त्यांना काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसे