नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचे अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार असून यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपासून ४ जानेवारी या कालावधीत सरल डाटबेसवरून तर व्यावसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षा यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, गुणवत्ता सुधार व निवडक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते १८ जानेवारीदरम्यान प्रचलित ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेला नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व निवडक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचे अर्ज ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाइन पध्दतीने महाएचएससी बोर्ड या संकेतस्थळावर भरायाचे असून, त्यासाठीचे वेळापत्रकही राज्य शिक्षण मंडाळाने जाहीर केले आहे. त्यानुसार, यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपासून ४ जानेवारी या कालावधीत नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. तर व्यावसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, गुणवत्ता सुधार व निवडक विषय घेऊन प्ररीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते १८ जानेवारीदरम्यान प्रचलित ऑनलाइन पद्धतीने नियमित शुल्कासह अर्ज करण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आली आहे. तर उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाउलोड करून १५ डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत बँकेत शुल्क भरण्याच्या सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आल्या असून, परीक्षा अर्जासंदर्भातील सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकणार आहे.