नाशिक : महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार ३० जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना रविवार (दि.२६) पासून ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची संधी मिळणार असून, या अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर पूर्ण करावी लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत एक महाविद्यालयाची भर पडली आहे. या महाविद्यालयातील वाढलेल्या जागांसह नाशिक शहरात एकूण २५ हजार ३० जागा अकरावी प्रवेशासासाठी उपलब्ध झाल्या असून, यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या १० हजार १६०, वाणिज्यच्या ८ हजार ६००, कला शाखेच्या ४ हजार ९१० व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (एचएसव्हीसी) १३६० जागांचा समावेश आहे. यापूर्वी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून (दि. १५) सुरू होणार होती. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन झाल्याने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेश अर्जाचा भाग भाग एक भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होईल, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-२ अर्थात महाविद्यालयाचे पर्याय (पसंतीक्रम) निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी वाढीव प्रवेशशुल्काचा भुर्दंड टाळण्यासाठी अनुदानित महाविद्यलयांमधील जागांचा पर्याय निवडण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
अकरावी प्रवेशासाठी रविवारपासून ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरण्यासाठी संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 5:50 PM
अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार ३० जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना रविवार (दि.२६) पासून ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची संधी मिळणार आहे.
ठळक मुद्देअकरावी प्रवेश प्रक्रियेला रविवार पासून सुरुवातऑनलाईन अर्जाचा भाग एक भरता येणार भाग दोनची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर