जागतिक कौशल्य स्पर्धेत १ जानेवारी १९९९ नंतर जन्म झालेले उमेदवार सहभागी होऊ शकणार असून, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, मेकेट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग, मॅन्युफॅक्चरिंग टीम चॅलेज, वॉटर टेक्नॉलॉजी, क्लाउड कॉम्युटिंग आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी१९९६ तद्नंतरचा असणे आवश्यक आहे. जिल्हा, विभाग, राज्य व देशपातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे २०२२ मध्ये चीनमधील शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सादर प्रस्तावानुसार जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन १ मार्च ते ३१ मे, २०२१ या कालावधीत संबधित जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तसेच तांत्रिक विद्यालयाच्या ठिकाणी आयोजन करण्यात येत असून स्पर्धेत सहभागासाठी इच्छुकांनी २८ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धेत २८ फेब्रुवारीपर्यंत सहभागाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:20 AM