नाशिक :वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची व अर्जात ऑनलाइन दुरुस्ती करण्याची मुदत संपल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी तसेच परीक्षा अर्जाचा भाग दोन, तीन आणि चार भरण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नीटसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत राबविण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना ६ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी ७ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांच्या आॅनलाइन अर्जातील दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) अनेक विद्यार्थ्यांकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एनटीएने नीटसाठीऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत संधी उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भागातील संपूर्ण माहिती भरण्यासह तिसºया भागात आवश्यक स्कॅन केलेल्या कागदपत्रांच्या प्रती व चौथ्या भागात परीक्षा शुल्कासहऑनलाइन अर्ज भरल्याची पोचपावती या माहितीसह विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, एनटीएने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुदतवाढ व अतिरिक्त संधी उपलब्ध क रून दिली असली तरी नीट परीक्षा ही पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ३ मे रोजीच होणार आहे. त्यासाठी हॉलतिकीट २७ मार्चपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असल्याची माहिती एनटीएतर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नीटचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 6:59 PM
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) अनेक विद्यार्थ्यांकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एनटीएने नीटसाठीऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत संधी उपलब्ध करून दिली आहे
ठळक मुद्देनीट परीक्षा अर्जाचा दुसरा, तीसरा,चौथा भाग भरता येणारपरीक्षा शुल्क भरण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत संधी