अझहर शेख। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिकचे द्राक्षे जगप्रसिद्ध जरी असले तरी आंतरराष्टÑीय बाजारपेठ द्राक्षांसाठी सध्या मर्यादित स्वरूपाची आहे. २०१०-११ साली येथील द्राक्षांना भौगोलिक मूल्य व गुणवत्तेसाठी ‘जी आय’ मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना स्थान मिळाले; मात्र ही बाजारपेठ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी आता नाशिकच्या द्राक्षांना ‘पीजीआय’ मानांकनाची गरज आहे. यासाठी स्थानिक द्राक्ष उत्पादकांस राजकीय पुढाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे.नाशिकमधील द्राक्षांचे उत्पादन मोठे आहे. भारताची द्राक्ष राजधानी म्हणूनही नाशिकचा नावलौकिक आहे. नाशिकच्या द्राक्षांना भौगोलिक मानांकन २०१०-११ साली मिळाले. यामुळे नाशिकच्या द्राक्षांना आंतरराष्टÑीय बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान प्राप्त होण्यास मदत झाली. नेदरलॅँड, जर्मनी, युनायटेड किंग्डम, बेल्जियम यांसह चीन, रशिया या देशांमध्येही द्राक्षांना मोठी बाजारपेठ आहे. द्राक्षांसोबत नाशिकच्या वाइनलाही भौगोलिक मानांकन प्राप्त आहे. द्राक्षांसोबत वाइनची सर्वाधिक निर्यात करणारे भारतातील नाशिक हे मोठे शहर आहे. लाखो हेक्टर जमिनीवर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. पीजीआय टॅग (प्रोटेक्टेड जिओग्रॅफिकल इंडिकेशन) मिळाल्यानंतर दार्जिलिंग चहाप्रमाणे द्राक्षांना जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली होण्यास मदत होईल. हे मानांकन प्राप्त करण्यासाठी स्थानिक द्राक्ष उत्पादकांसह सत्ताधाºयांनी इच्छाशक्ती दाखविणे गरजेचे आहे. भारतात ‘पीजीआय’ केवळ दार्जिलिंगच्या चहाकडे शेतीशेत्रात आहे. त्यानंतर नाशिकच्या द्राक्षांना हे मानांकन मिळविण्याची संधी असून द्राक्षे त्या पातळीवर खरे उतरू शकतील, असा विश्वास भौगोलिक मानांकन तज्ज्ञ अॅड. गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केला.भारतात ‘पीजीआय’ केवळ दार्जिलिंगकडेभारतातील विविध राज्यांचे मिळून एकूण ३२२ उत्पादनांकडे ‘जीआय टॅग’ आहे; मात्र दार्जिलिंगमधील चहा हे एकमेव उत्पादन असे आहे की, ते आंतरराष्टÑीय ब्रॅन्ड म्हणून ओळखले जाते. दार्जिलिंगच्या चहाला जीआयसोबत पीजीआय टॅगदेखील प्राप्त आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत हे ब्रॅन्ड स्थापन झाले आहेत. दार्जिलिंगच्या चहानंतर नाशिकच्या द्राक्षांमध्ये ‘पीजीआय’ मानांकन मिळविण्याची क्षमता आहे. पीजीआय’ येथील द्राक्षांना मिळाला तर आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सुमारे दीडशेहून अधिक देशांमध्ये बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
नाशिकच्या प्रसिद्ध द्राक्षांना ‘पीजीआय’ मानांकनाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:02 AM
नाशिकचे द्राक्षे जगप्रसिद्ध जरी असले तरी आंतरराष्टÑीय बाजारपेठ द्राक्षांसाठी सध्या मर्यादित स्वरूपाची आहे. २०१०-११ साली येथील द्राक्षांना भौगोलिक मूल्य व गुणवत्तेसाठी ‘जी आय’ मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना स्थान मिळाले; मात्र ही बाजारपेठ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी आता नाशिकच्या द्राक्षांना ‘पीजीआय’ मानांकनाची गरज आहे. यासाठी स्थानिक द्राक्ष उत्पादकांस राजकीय पुढाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे.
ठळक मुद्देहवी राजकीय इच्छाशक्ती : दार्जिलिंग चहाच्या धर्तीवर होईल आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड