नाशिक : राज्यात कॉँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी आहे, त्या निमित्ताने जनसामान्यांची कामे करण्याची संधी आता पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मिळाली असून, या संधीचा उपयोग करून जो पक्षासाठी काम करेल अशांना पक्षात चांगली संधी देण्याचे सुतोवाच कॉँगे्रसचे महाराष्टÑ प्रभारी एच. के. पाटील यांनी केले आहे.नगर जिल्हा दौºयावर जाताना कॉँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचे गुरूवारी मध्यरात्री नाशिक येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अखिल भारतीय कॉँग्रेसचे चिटणीस आशिष दुवा, उत्तर महाराष्टÑाचे प्रभारी वामसी रेड्डी, संपतकुमार, प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी हे होते. पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी संगमनेर येथे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात र्व्हच्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने मुंबईहून येताना पाटील काही काळ नाशिक येथे विश्रांतीसाठी थांबले. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी, विविध आघाडीच्या प्रमुखांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. पाटील यांनी यावेळी नाशिक जिल्'ातील पक्षांतर्गंत तसेच राजकीय परिस्थिती समजावून घेतली त्याच बरोबर आगामी काळात पक्ष संघटनेत काही फेरबदल करण्याचे संकेतही दिले. राज्यात कॉँग्रेसपक्ष सत्तेत असल्याने त्याचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करावा, त्याच बरोबर अलिकडेच केंद्र सरकारने कामगार व शेतकरी विरोधी कायदे केले असल्याने या कायद्याच्या विरोधात कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी असे आवाहनही केले. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, डॉ. हेमलता पाटील, दिनेश बच्छाव, रमेश कहांडोळ, आकाश छाजेड, स्वप्नील पाटील, श्याम सनेर, रामदास धांडे, आलेमन शेख, हनिफ बशीर, किरण जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.