नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आॅनलाइन परीक्षा, प्रकल्प सादरीकरणाच्या पर्यायांचा विचार करीत असून, अशाप्रकारे आॅनलाइन परीक्षा घेणे कठीणच नव्हे तर अशक्य असल्याचे मत व्यक्त करीत महाराष्ट्र स्ट्युडंट युनियनकडून (मासू) आॅनलाइन परीक्षांना विरोध करण्यात आला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांमध्ये अजूनही अभ्यासक्रम अपूर्ण असून, विद्यापीठात पुण्याच्या बाहेरील शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात अनेक विद्यार्थी पुणे सोडून मूळ गावी परतलेले आहेत, काही महाविद्यालये आॅनलाइन शिकवणी सुरू करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असले तरी या उपक्रमात सोयी-सुविधा उपलब्ध असलले निवडक विद्यार्थी सहभाग घेत असून, महाविद्यालये सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. लॉकडाउन ३ मे रोजी संपल्यांनंतर कोरोना विषाणूंचा अटकाव करण्यासाठी रेल्वे, बस अशा प्रकारचे सार्वजनिक वाहतूकही पुढील काही महिने बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ परीक्षा घेणे हे कठीणच नव्हे तर अशक्य असल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्र स्ट्युडंट युनियनचा आॅनलाइन परीक्षांना विरोध असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ तेजाळे यांनी सांगितले.
आॅनलाइन परीक्षांना विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 9:27 PM