नाशिक : शहरातील सामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या इदगाह मैदानावर बस टर्मिनल उभाण्याचा निर्णय राजकीय दृष्टीने घेण्यात आल्याचा आरोप करीत, संविधानप्रेमी नाशिककर संस्थेने विरोध बस प्रस्तावित टर्मिनलला विरोध नोंदवला असून, या संदर्भात सोमवारी (दि.११) संस्थेच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
नाशिक शहर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करीत, ईदगाह मैदान परिसरात बस टर्मिनल उभारून या मैदानाचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निवेदनात नमूद करीत, या प्रकरणात महसूल विभागाने चौकशी करण्याची मागणीही संविधानप्रेमी नाशिककर संस्थेने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या बस टर्मिनल उभारण्याचा निर्णय मागे घ्यावा व पर्यायी जागांचा विचार करण्यात यावा, अन्यथा रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा संघटनेने निवेदनातून दिला आहे. यावेळी किरण मोहिते, राजू देसले, पद्माकर इंगळे, महादेव खुडे, आसिफ शेख, संतोष जाधव, नितीन मते, अॅड.नझिर काझी, अॅड.प्रभाकर वायचळे उपस्थित होते.
(आरफोटो-११बस टर्मिनस) अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन देताना, संविधानप्रेमी नाशिककर संघटनेचे किरण मोहिते, राजू देसले, पद्माकर इंगळे, महादेव खुडे, आसिफ शेख, संतोष जाधव, नितीन मते, अॅड.नझिर काझी, अॅड.प्रभाकर वायचळे आदी.