नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत झालेली रेशनची व्यवस्था सुरळीत करून गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळावे यासाठी जिल्हा घरकाम मोलकरीण संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. कॉ. राजू देसले व संगीता उदमले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घरकामगार मोलकरणींना अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत रेशन देण्यात यावे, रेशनला पर्याय म्हणून रोख स्वरूपात पैसे हस्तांतरण करण्यात येऊ नये, सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक बळकट करण्यात यावी, रेशनवर १४ जीवनावश्यक वस्तु व भरड धान्य मिळावे, घासलेटचा कोटा पूर्ववत करावा आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात आम्रपाली अहिरे, भारती खैरे, कल्पना निकम, राधा जाधव, चंद्रभागा गरुड, ज्योती धुमाळ, मीना आढाव, शोभा चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
घरकाम मोलकरीण संघटनेच्या वतीने निदर्शने
By admin | Published: May 15, 2015 1:11 AM