शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

वीज क्षेत्र खासगीकरण करण्याच्या निर्णयास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:39 PM

एकलहरे : नॅशनल को-आॅर्डिनेशन कमिटी आॅफ इलेक्ट्रीसिटी एम्प्लाईज अ‍ॅन्ड इंजिनिअर्स (एनसीसीईईई)च्या राष्ट्रीय परिषद सदस्यांची आॅनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स (बैठक) नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत वीज क्षेत्र खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयास विरोध करण्यात आला.

एकलहरे : नॅशनल को-आॅर्डिनेशन कमिटी आॅफ इलेक्ट्रीसिटी एम्प्लाईज अ‍ॅन्ड इंजिनिअर्स (एनसीसीईईई)च्या राष्ट्रीय परिषद सदस्यांची आॅनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स (बैठक) नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत वीज क्षेत्र खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयास विरोध करण्यात आला.या बैठकीत एनसीसीईईईमध्ये सहभागी राष्ट्रीय पातळीवर कामगार व अभियंते यांची संघटना आॅल इंडिया फेडरेशन आॅफ इलेक्ट्रीसिटी एम्प्लॉईजचे राष्ट्रीय महासचिव मोहन शर्मा, राष्ट्रीय सचिव कृष्णा भोयर यांच्यासह ११ संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सुधारित विद्युत कायदा- २०२० च्या प्रारूपची अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दि.१६ मे रोजी विद्युत क्षेत्र हे खासगी भांडवलदारांंना खुले करण्याचा निर्णय घेतला असून, खासगी वीज निर्मिती प्रकल्पास जीवदान देण्यासाठी करोडो रु पयांचे पॅकेज जाहीर केले, याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. विद्युत क्षेत्रात सुधारणा करून हे क्षेत्र खासगी क्षेत्रास खुले करण्यासाठी सार्वजनिक सूचना देण्याकरिता मुदतवाढ दि.५ जूनपर्यंत केंद्र सरकारने वाढ केलेली असताना व देशभरात कोविड- १९ चा मुकाबला करण्यासाठी लॉकडाउन सुरू असताना सरकारने घाई करत सूचना मागितल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सध्या अनेक राज्य सरकार कोविड-१९ विरोधात लढा देत असताना पंतप्रधानांनी विद्युत कायदा-२०२० ला संमती देत, केंद्रशासित आठ प्रदेशात वितरण कंपन्यांंचे पूर्णपणे खासगीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रि या सुरू करण्याचे वित्तमंत्री यांनी दिलेले आदेश याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सुधारित कायद्यास रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा निर्णय आॅल इंडिया फेडरेशन आॅफ इलेक्ट्रीसिटी एम्प्लॉईजने घेतलेला आहे.महाराष्ट्रातील सर्व कामगार, अभियंते व अधिकारी संघटना पदाधिकारी यांंना नवीन सुधारित विद्युत कायदा २०२० चे महत्त्व सांगण्यासाठी लवकरच राज्यव्यापी परिषद आयोजित करून हा विद्युत कायदा कसा सार्वजनिक वीज उद्योगाचे अस्तित्व संपविणारा असून, केवळ खासगी भांडवलदार मोठे करण्यासाठी म्हणून केंद्र सरकार सुधारित विद्युत विधेयक आणत आहे. या विधेयकास विरोध करणे ही काळाची गरज आहे. म्हणून लवकरच एनसीसीईईईमध्ये सहभागी संघटना नेतृत्व पुढाकार घेऊन महाराष्ट्रात कार्यरत सर्व कामगार, अभियंते व अधिकारी यांच्या संघटना पदाधिकारी यांची आॅनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स बोलाविणार आहे.-------------------बैठकीत घेण्यात आलेले निर्णय असेदि.१ जून २०२० रोजी देशभरातील अभियंते व कामगार काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या वीज धोरणाचा विरोध करणार.नवीन विद्युत कायदा २०२० बाबत देशातील जनता, शेतकरी, कामगार व सामाजिक संघटनांचा संयुक्त आंदोलनात सहभाग.वीज ग्राहक, सर्व संघटना पदाधिकारी, सभासद, कामगार व अभियंते यांना सोशल मीडियावर नवीन कायद्याबाबत माहिती देऊन जागृती करण्याचा निर्णय.

टॅग्स :Nashikनाशिक