सटाणा - मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालिकेच्या वतीने विविध कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले; परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांऐवजी अन्य दोन मंत्री कार्यक्रमाला आले आणि हा कार्यक्रम पालिकेऐवजी भाजपाचीच प्रचारसभा झाल्याचा आरोप करीत आता विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सदर कार्यक्रमावर झालेल्या सुमारे ३० लाख रुपये खर्चाची बिले काढण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून पालिकेतील सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या महिन्यातील नियोजित सटाणा दौरा हा अशासकीय दौरा असल्याने या दौऱ्याच्या कार्यक्र मावर झालेल्या लाखो रु पयांची बिले नगरपालिका प्रशासनाने अदा करू नयेत, अशी मागणी पालिकेतील कॉँग्रेसचे नगरसेवक व नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या नियोजित कार्यक्र माबाबत नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी नगरसेवकांची विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. सभेत पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री पुनंद (ता. कळवण) येथे येणार असून, या कार्यक्र माच्या खर्चास मंजुरी द्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष मोरे यांनी सर्व नगरसेवकांना केले होते.या आवाहनास सर्व नगरसेवकांनी प्रतिसाद देत मंजुरीही दिली होती; मात्र मुख्यमंत्री या नियोजित कार्यक्र मास आलेच नाहीत. त्यांच्याऐवजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पुनंद (ता. कळवण) ऐवजी सटाणा येथे भाजपाचीच प्रचारसभा झाली. हा कार्यक्र म पूर्णपणे भाजपाच्या झेंड्याखाली झाला असताना सदरचा खर्च ‘क’ वर्ग असलेल्या नगरपालिकेवर टाकणे व्यवहार्य नाही. या दौऱ्याच्या खर्चाची जवळपास तीस लाख रु पयांची बिले नगरपालिका प्रशासनाकडे मंजुरीसाठी प्राप्त झाली असून, ही बिले प्रशासनाने मंजूर करू नयेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर पाटील यांच्यासह काँग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते काका सोनवणे, नगरसेविका सुलोचना चव्हाण, आशा भामरे, शमा मन्सुरी यांच्या स्वाक्षºया आहेत.मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पर्यटन मंत्री यांच्या दौºयासंदर्भात येणाºया खर्चासाठी गेल्या २६ डिसेंबर रोजी विशेष सभा बोलावून सर्व नगरसेवकांच्या संमतीने ठराव करण्यात आला आहे. आतापर्यंत पालिकेकडे विविध खर्चापोटी १७ लाख रु पयांची बिले सादर करण्यात आली आहेत. शहरासाठी मंजूर असलेल्या पुनंद पाणीपुरवठा योजना भूमिपूजन, स्कायवॉक पूल, रिंग रोड अशा विविध शहर विकास योजनांचा मंत्री महोदयांच्या हस्ते डिजिटल शुभारंभ करण्यात आला आहे. कायद्याने मंत्री महोदयांचे स्वागत करणे क्र मप्राप्त आहे. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून विरोधास विरोध करू नये.- सुनील मोरे, नगराध्यक्ष, सटाणापालिकेच्या विशेष सभेत मंत्री महोदयांच्या कार्यक्र मासाठी येणाºया खर्चासाठी एकमताने अनुमती घेतली आहे. त्यानुसार खर्चाची बिले संबंधितांकडून सादर केली जात आहेत; मात्र अद्याप कोणालाही बिल अदा करण्यात आलेले नाही.- हेमलता डगळे-हिले, मुख्याधिकारी, सटाणा पालिका
मंत्र्यांच्या कार्यक्रमाची बिले काढण्यास आक्षेप, पालिकेतील सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 5:50 AM