नाशिक : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते निवडणुकीच्या आदल्या रात्रीपर्यंत उमेदवारांनी निवडणूक प्रचारावर केलेला खर्च निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केला असून, त्यात खर्चात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे हे आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर युती व आघाडीच्या उमेदवारांचा खर्च समान असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, खर्च निरीक्षकांनी सर्वच उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी सुरू केली आहे.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांना त्यांचा निवडणूक प्रचारावरील खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी दर सहा दिवसांनी त्यांची पडताळणी केली गेली. त्यामुळे साधारणत: २२ दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी प्रचारात कोटीची उड्डाणे केलीत; खर्च मात्र सर्वाधिक ३१ ते ३३ लाखांपर्यंतच दाखविण्यात आला. निवडणूक खर्च विभागाद्वारे पडताळणी केली असता, उमेदवारांचा खर्च आठ ते दहा लाखांहून अधिक असतानाही तो कमी दाखविल्याबद्दल प्रमुख तिन्ही उमेदवारांना आजवर दोन नोटिसा पाठवून त्यांचा खुलासा मागविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघात प्रमुख उमेदवारांद्वारे अखेरच्या दोन दिवसांत म्हणजेच ७ व ८ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या तारखेपासून प्रचाराची मुदत संपण्याच्या म्हणजे, २७ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत उमेदवारांच्या खर्चावर आयोगाचा ‘तिसरा’ डोळा होता.या कालावधीत उमेदवारांनी निवडणूक खर्च विभागाला सादर केलेला खर्च व उमेदवारांच्या प्रचारावर एफएस, एसएसटी, व्हीएसटी, व्हीव्हीटी व अकाउंटिंग टीमद्वारे प्रचारावर नजर ठेवण्यात आली.यांच्या खर्चावर घेतला आक्षेपमाणिकराव कोकाटे, खासदार हेमंत गोडसे,समीर भुजबळ खर्चाचे आॅब्झर्व्हर नंतर येणारउमेदवारांनी प्रचार बंद होण्यापूर्वीपर्यंत २७ एप्रिलपर्यंतचा खर्च निवडणूक खर्च विभागाला सादर केला आहे. या खर्चाची पडताळणी निवडणूक विभागाद्वारे आयोगाचे निरीक्षकांमार्फत पडताळणी केली जात असून, खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारीकरीत आहेत. सर्वच उमेदवारांनी २६ एप्रिलपर्यंतचा खर्च सादर केला असून, अंतिम खर्च सादर करण्यास त्यांना अजून ३० दिवसांचा अवधी आहे. त्यानंतर आयोगाने नेमलेल्या खर्च निरीक्षकांमार्फत त्याची पडताळणी केली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. असा साधणार खर्चाचा ताळमेळलोकसभा निवडणुकीत उमेदवारांना ७० लाख रुपयांची खर्चमर्यादा आहे. त्याअनुषंगाने उमेदवार खर्च सादर करतात. मात्र, एफएस, एसएसटी, व्हीएसटी व व्हीव्हीटी टीमदेखील उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण करत असते व त्या अनुषंगाने निवडणूक दरपत्रकाद्वारे हा खर्च उमेदवारांच्या नावाने जमा करण्यात येतो. या खर्चामध्ये तफावत असल्याने आता उमेदवार व टीम यांच्या समोरासमोर चर्चा होऊन ताळमेळ साधला जाईल.उमेदवारांनी २६ एप्रिलपर्यंत सादर खर्चाची टीमद्वारे पडताळणी करण्यात येत आहे. तीन उमेदवारांना नोटीस बजावली होती. त्यांचा खुलासा पडताळून पाहत आहोत.- अरुण आनंदकरनिवडणूक अधिकारी उमेदवार खर्चसमीर भुजबळ 31,01,386हेमंत गोडसे 31,61,717पवन पवार 3,92,562विनोद शिरसाठ 33,598माणिक कोकाटे 33,12,788प्रकाश कनोजे 30,621सुधीर देशमुख 77,893देवीदास सरकटे 13,500विलास देसले 14,3950वैभव आहिरे 5,200प्रियंका शिरोळे 29,720शरद धनराव 15,000सोनिया जावळे 29,125शरद अहिरे 23,655संजय घोडके 41,528शिवनाथ कासार 26,600सिंधुबाई केदार 28,850धनंजय भावसार 26,400