मालेगाव: तालुक्यातील पाटणे येथून बाहेरगावी पाणी घेऊन जाणाऱ्या विहिर जलवाहिन्यांवर बंदंी घालण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.ग्रामसभेच्या ठरावात म्हटले आहे की पाटणे गावाच्या शिवारातून बाहेरगावातील शेतकरी शेतीसाठी पाणी नेण्याच्या तयारीत आहेत. काही शेतकऱ्यांनी खाजगी शेतकऱ्यांकडून जागा देखील खरेदी केली आहे. येथून पुढे नव्या विहिरीसाठी जागा खरेदी करू नये तसेच बाहेरगावातील पाईपलाईनसाठी शेतकºयांनी परवानगी देऊ नये यापूर्वी देखील काही जलवाहिन्या गेल्या आहेत. सदर गाव हे डार्क झोनमध्ये आहे. गावाच्या पाण्याची पातळी यापूर्वीच कमी झालेली आहे.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने बाहेरगावी नवीन विहीर खोदून नवीन पाईपलाईनद्वारे बाहेरगावी पाणी गेल्यास गावातील पिण्याच्या पाण्याची पसिस्थिती आणखी बिकट होणार आहे. याकरिता ज्या नवीन विहिरी पाईपलाईनद्वारे जे पाणी बाहेरगावी जाणार आहे ते पाण जाऊ देण्यास बंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ठरावाची सूचना सुरेश बागुल यांनी मांडली तर त्यास तुषार वाघ यांनी अनुमोदन दिले. बैठकीस सरपंच रावलाबाई अहिरे, उपसरपंच जितेंद्र खैरनार व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
पाटणेतून बाहेरगावी पाणी देण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 5:35 PM