कळवण : तालुक्यातील पुनंद प्रकल्पातून सटाणा शहराला जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला शासनाने मान्यता दिल्याने कळवण तालुक्यात राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेसने विरोध केल्यानंतर आता माकपनेदेखील विरोध दर्शवित या योजनेविरोधात उडी घेतली आहे. या योजनेबाबत जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे शासनस्तरावरून कुठलाही प्रस्ताव अद्याप आला नसल्याने त्यापूर्वीच स्थानिक स्तरावर होत असलेल्या विरोधामुळे आता योजनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण तयार झाले आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सटाणा शहरातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून खास बाब म्हणून ही योजना मंजूर केली आहे.या गावांनी ग्रामसभेत केला विरोधसटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला सुपलेदिगर, काठरेदिगर, शेरी, भैताणे, निमपाडा, जयदर, सुळे, सावरपाडा, पिंपळे, चाफापाडा, दह्याणे, हुंड्यामोख, उंबरेबन, पिंपळे खुर्द, गणोरे, पाडगण, नाळीद, भांडणे, इन्शी, देसराणे, रवळजी, कोकणीपाडा, मोकभणगी, दरेभणगी, ककाणे, खेडगाव, नाकोडे, पाटविहीर, विसापूर, बिजोरे, नवी बेज, जुनी बेज, भादवण, गांगवण, बगडू, चाचेर, धनगरपाडा, पिळकोस, खामखेडा, सावकी या परिसरातील ४० गाव वाड्या वस्तीवरील शेतकरी बांधवांनी विरोध दर्शविला आहे.
ग्रामपंचायतींमध्ये ठराव : जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध पुनंदच्या पाण्यावरून राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:12 AM
कळवण : तालुक्यातील पुनंद प्रकल्पातून सटाणा शहराला जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला शासनाने मान्यता दिल्याने कळवण तालुक्यात राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.
ठळक मुद्देयोजनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण खास बाब म्हणून ही योजना मंजूर